एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Local Train | मॉन्सूनच्या पहिल्याच सरींनी लोकल सेवा ठप्प

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने आज लोकल सेवा ठप्प झाली होती.

ठाणे : आज पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. आणि साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफ लाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही. 

सकाळी झालेल्या पावसामुळे, मध्य रेल्वेच्या कुर्ला, सायन, माटूंगा या तीन स्टेशन दरम्यान ट्रॅक वरील साचलेल्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सकाळीच मध्य रेल्वेवरील जलद आणि धिमा मार्ग बंद करण्यात आला. यानंतर चुनाभट्टी स्थानकात पाणी साचल्याने हार्बर लाईन देखील बंद करण्यात आली. मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान तब्बल नऊ तास सेवा बंद होती. केवळ ठाणे ते कर्जत आणि कसारा या स्थानकादरम्यान विशेष लोकल सोडण्यात येत होत्या. तसेच हार्बर लाइन वरील वाशी ते सीएसएमटी दरम्यान सकाळनंतर दिवसभर एकही लोकल धावली नाही. वडाळा स्थानकात पाणी साचल्याने सीएसएमटी ते गोरेगाव ही वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली होती. अखेर संध्याकाळी आठच्या सुमारास मध्य रेल्वेच्या ट्रॅकवरील पाणी ओसरल्याने सुरुवातीस ठाणे ते सीएसएमटीही धीमी मार्गिका सुरू करण्यात आली. हार्बर मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती.

Mumbai Rains Update : मुंबईत पावसाची विश्रांती तर पश्चिम उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

मध्य रेल्वे जरी ठप्प झाली तरी पश्चिम रेल्वे मात्र प्रचंड पावसात देखील सुरु होती. मुसळधार पावसामुळे मर्यादित वेगात पश्चिम रेल्वेच्या लोकल धावत होत्या. तसेच ट्रान्स हार्बर मार्गदखील दिवसभर सुरू होता. पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला. अनेक गाड्या या पूर्ननिर्धारित केलेल्या वेळेत सोडण्यात आल्या.

रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर
मध्य रेल्वेची धिमी मार्गिका सुरू, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धीम्या लाईन वर लोकल सेवा सुरु झाली आहे. सकाळी 9.50 ला सर्व मार्गिका बंद झाल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्यांदा लोकल सुरू झाल्या आहेत. सोबत सीएसएमटी ते गोरेगाव ही हार्बर मार्गावरील वाहतूक देखील सुरू झालीय. आता केवळ सीएसएमटी ते वाशी ही वाहतूक बंद आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Embed widget