Mumbai Rain Live Updates : पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली
Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
LIVE
Background
Mumbai Rain Live Updates : आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही.
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.
Palghar Rain Updates: पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली
Palghar Rain Updates: पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तर पालघर मनोर रोडवरील सूर्या नदीवर असलेला मासवनचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
Mumbai Rain : कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर , अनेक ठिकाणी पाणी साचले
आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसर ,डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर ,मानपाडा पोलीस स्टेशन अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला होता, तो नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. आज सकाळपासून पावसाची नोंद 47 मिली मीटर नोंद झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापनने दिली आहे. त्याच प्रमाणे जून महिन्यामध्ये एकूण 201 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासन दिली आहे.
Mumbai rain Updates : मागील 6 तासांची पावसाची आकडेवारी
मागील 6 तासांत पावसाची आकडेवारी
(सकाळी 8.30 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत)
मुलुंड : 154 mm
दहिसर : 152
माजीवडा : #Thane 146
बोरीवली : 144
मुंब्रा : 132
बदलापूर : 130
मानपाडा : 120
ऐरोली : 109
डोंबिवली : 102
Thane Rain Updates : ठाण्यातील खोपट इथे वडाचे झाड कोसळले
Thane Rain Updates : ठाण्यातील खोपट इथे वडाचे झाड कोसळले, झाडाखाली एक रिक्षा आणि एक चारचाकी अडकली, झाड बाजूला करण्याचे काम सुरू
Mumbai rain Updates : मागील 6 तासांची पावसाची आकडेवारी
मागील 6 तासांत पावसाची आकडेवारी
(सकाळी 8.30 पासून)
कुलाबा - 72.5 मिमी
भायखळा - 28 मिमी
वरळी - 26 मिमी
वांद्रे - 37 मिमी
चेंबूर - 50 मिमी
दादर - 17 मिमी
जुहू विमानतळ - 67 मिमी
मुंबई विमानतळ - 86.5 मिमी
विलेपार्ले - 53 मिमी
अंधेरी - 57 मिमी
विक्रोळी - 57 मिमी
मरोळ - 60 मिमी
जोगेश्वरी - 64 मिमी
कांजूर मार्ग - 67 मिमी
दिंडोशी - 73 मिमी
बोरीवली - 143 मिमी
दहिसर - 152 मिमी
मुलुंड - 48 मिमी
मुंब्रा - 135 मिमी
चिराग नगर, ठाणे - 142 मिमी
माजिवाडा - 133 मिमी
ढोकळी - 125 मिमी
ऐरोली - 108 मिमी
वाशी - 60 मिमी
डोंबिवली पश्चिम - 103 मिमी
डोंबिवली पूर्व - 94 मिमी
कल्याण - 62 मिमी