एक्स्प्लोर

मुंबईतील सर्व पुलांखाली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्या, न्यायालयात जनहित याचिका

Mumbai: मुंबईतील दिवसेंदिवस वाढत्या पार्किंगच्या समस्येवर कायस्वरुपी तोडगा म्हणून सर्व पुलांच्या खाली आवश्यक त्या सुरक्षा नियमांचं पालन करून वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली होती.

Mumbai: मुंबईतील दिवसेंदिवस वाढत्या पार्किंगच्या समस्येवर कायस्वरुपी तोडगा म्हणून सर्व पुलांच्या खाली आवश्यक त्या सुरक्षा नियमांचं पालन करून वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली होती. हायकोर्टानं याची गंभीर दखल घेत राज्य सरकारसह एमएमआरमधील सर्व महानगरपालिकांना नोटीस बजावली व याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदीप बैस यांनी वकील उदय वारूंजीकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.  

साल 2008 पूर्वी पुलांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागा वाहनतळांसाठी वापरल्या जात होत्या. मात्र, गाड्यांना आग लागण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पुलांच्या खाली वाहनतळाची सुविधा उपलब्ध करू नये, असं मत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमाच्या कलम 56 नुसार, सरकारनं साल 2009 मध्ये पुलांखाली वाहनतळांना परवानगी न देण्याबाबतचा आदेश काढण्यात आला. या आदेशात रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या करण्यासही मज्जाव करण्यात आला. 

सध्या एमएमआर क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकासाशी निगडीत बांधकामं केली जात आहेत. त्यामुळे एमएमआर क्षेत्रात वाहनतळांसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे पुलांच्या खालील मोकळ्या जागेचा वाहनतळासाठी वापर करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून याचिकाकर्त्यांनी केली आहे. या वाहनतळाचा सरकार आणि महानगरपालिकांना महसूलासाठीही फायदा होऊन सरकारी तिजोरीतही वाढ होईल, असा दावाही बैस यांनी याचिकेतून केला आहे

मुंबईत लवकरच बनवण्यात येणार  5 हजार 560 मीटर लांबीचा पूल

दरम्यान, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा यासाठी लवकरच तब्बल 5.56 किलोमीटर लांबीचा पूल अर्थात मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 5 हजार 560 मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली आहे. तसेच याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 42 महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पूल खात्याद्वारे सांगितलं आहे की, प्रस्तावित मार्ग हा दक्षिण मुंबईतील (Mumbai) पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या या ईस्टर्न फ्री-वे येथून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. ईस्टर्न फ्री-वे ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र भविष्यात हे अंतर कापण्यासाठी हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील.     

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMahavikas Aaghadi Meeting  : आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठकाABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 8 AM 07 October 2024Raosaheb Danve VS Arjun Khotkar : आज आम्ही सुपात उद्या तुम्ही जात्यात याल, दानवेंना खोतकरांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
आमदारांना नो एंट्री, पण या नेत्यांना परत घेणार, उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Mhada Lottery 2024 : म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईतील घराचं स्वप्न पाहणारांची धाकधुक वाढली, थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार?
म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईत सोहळ्याचं आयोजन, थेट प्रक्षेपण कुठं पाहणार?
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
Embed widget