एक्स्प्लोर
'पद्मावत'साठी सिनेमागृहांना सुरक्षा देणार : मुंबई पोलीस
करणी सेनेचा विरोध पाहता मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पद्मावत सिनेमाविरोधात घेतलेली करणी सेनेची भूमिका कायम आहे. त्यामुळे या हा सिनेमा रिलीज होईल त्यादिवशी सिनेमागृहांना सुरक्षा देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस योग्य पाऊलं उचलतील, असं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते दीपक देवराज यांनी सांगितलं आहे.
करणी सेनेचा विरोध पाहता मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमा रिलीज करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं जाईल, असं दीपक देवराज यांनी स्पष्ट केलं.
'पद्मावत' सिनेमाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. चार राज्यातील पद्मावतीच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात 'पद्मावत' प्रदर्शित होणार आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
सिनेमाच्या घोषणेपासूनच करणी सेना विरोध करत आहेत. जर 'पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही तर सामूहिक आत्महदहन करु, अशी धमकी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तर धमकी दिली आहे. एवढंच नव्हे, सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ, असंही करणी सेनेने म्हटलं आहे.
'पद्मावत' सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती.
दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी 'पद्मावत' सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणारा विरोध कमी झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement