एक्स्प्लोर

Mumbai Terrorist : दहशतवादी जान मोहम्मदचा हॅन्डलर झाकीर हुसेन शेख आहे तरी कोण? 

मुंबईतून काल अटक करण्यात आलेला दहशतवादी झाकीर हुसेन शेख हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. त्यानेच जान मोहम्मदला या दहशतवादी कटामध्ये सामिल करुन घेतलं होतं.

मुंबई :  चार दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता मुंबईत काल रात्री एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलं आहे. झाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे. झाकीर हुसेन शेख हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. झाकीर शेख हा जान मोहम्मदचा हॅन्डलर असून त्यानेच जान मोहम्मदला हत्यारं आणि विस्फोटकांची डिलिव्हरी करण्यास सांगितलं होतं. 

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी झाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवलं होतं. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचला. झाकीरच्या पत्नीच्या मदतीने त्याला एक फोन केला. झाकीरला जोगेश्वरी परिसरात भेटायला बोलावलं आणि ताब्यात घेतलं.

जान मोहम्मदला ऑर्डर देणारा दहशतवादी ATS च्या जाळ्यात, हल्ल्याच्या प्लॅनचा मोठा खुलासा होण्याची शक्यता

कोण आहे झाकीर हुसेन शेख? 
झाकीर हुसेन शेखला जोगेश्वरी परिसरातून एटीएसने ताब्यात घेतल्याचं समजतंय. झाकीर हा धारावीतील जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया याचा हॅन्डलर होता. झाकीर शेख हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा उजवा हात आहे. शाकीरच्या माध्यमातून झाकीर हा अनिस इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे मुंबईच्या क्राईम ब्रॅन्चच्या रडारवर तो सुरुवातीपासूनच होता. 

झाकीरने अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामिल केलं होतं. झाकीर अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत होता. झाकीरच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता. 

फोन करून दिली बाँम्ब ठेवल्याची खोटी माहिती, मुंबईत पोलिसांचं सर्च ऑपरेशन

झाकीरला एका खंडणी प्रकरणात या आधी अॅन्टी एक्टॉर्शन सेलने अटक केली होती. आता त्याला मुंबईच्या शिवडी स्पेशल कोर्टमध्ये हजर केलं जाणार आहे. तिथून त्याला कस्टडीत घेऊन पुढच्या चौकशीसाठी दिल्लीला रवाना होणार आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने  चार दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून या दहशतवाद्यांनी तयारी सुरू केली होती. यामधील दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतलं आहे.  तसेच अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तगत जान मोहम्मद शेख हा या अतिरेक्यांना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व प्रकारची मदत पोहचवत होता.

 

Mumbai Local : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'गॅस अटॅक'ची योजना; गुप्तचर खात्याचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट; राज ठाकरेंनी मोजक्याच शब्दात सांगितली द लिजेंड आशाताईंची उंची, भावनिक अन् भरीव शब्द
Maharashtra Live Blog Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'

व्हिडीओ

Raj Thackeray On Asha Bhosle : भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला
Sanjay Raut PC : फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून राऊतांची टीका
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
जगबुडी नदीच्या पुलावर ट्रकची भीषण अपघात, कठड्यावर तरला; 200 फूट खोल पडता पडता वाचला
जगबुडी नदीच्या पुलावर ट्रकची भीषण अपघात, कठड्यावर तरला; 200 फूट खोल पडता पडता वाचला
Jalgaon Crime News : सामाजिक कार्यकर्ता ते ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र; जळगावमध्ये महिलेकडे e-KYCच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी करणाऱ्याबाबत पोलिसांनी सगळंच सांगितलं
सामाजिक कार्यकर्ता ते ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र; जळगावमध्ये महिलेकडे e-KYCच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी करणाऱ्याबाबत पोलिसांनी सगळंच सांगितलं
Embed widget