Urfi Javed :उर्फी जावेदचा 'तो' व्हिडीओ आला अंगलट, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हाही दाखल
Mumbai Police Action On Urfi Javed Video : मुंबई पोलीस अभिनेत्री उर्फी जावेदला अटक करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Mumbai Police Action On Urfi Javed Video : मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून (Urfi Javed Viral Video) उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई पोलिसांनी हा गुन्हा अभिनेत्री उर्फी जावेद, दोन अनोळखी महिला, एक अनोळखी इसम आणि इतर संबंधित जणांवर दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी कलम 171, 419, 500, 34 भा.दं.वि प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्त प्रसिद्धीसाठी कुणी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही
केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी कोणीही कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडीओ खरा नाही, त्यामध्ये पोलिसांचे सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे. पण हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचं सांगत पोलिसांनी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्हिडीओतील तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि त्यातील वाहनही जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही!
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 3, 2023
मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडिओ खरा नाही-सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे.
तथापि, दिशाभूल करणार्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलिस ठाणे…
उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन पोलीस महिला तिला ताब्यात घेताना दिसत आहेत. आश्लील व्हिडीओप्रकरणी उर्फीला अटक ताब्यात घेत असल्याचं त्या व्हिडीओमध्ये सांगण्यात येतंय.
View this post on Instagram
सुरूवातीला अनेकांना हा व्हिडीओ खरा असल्याचं वाटत होतं. पण केवळ प्रसिद्धीसाठी उर्फी जावेदने हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसून येतंय. तो व्हिडीओ लोकांना खरा वाटला त्यामुळे संपूर्ण देशात व जगात महिलांनी अपुरे कपडे घालण्यास मुंबई पोलीस हे अटक करतात असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली.
🚨 ' Urfi Javed ' is detained by Mumbai police for wearing inappropriate clothes in public places.#UrfiJaved pic.twitter.com/CqNSBDFr9q
— Mix Masala (@BollywoodOnly1) November 3, 2023
ही बातमी वाचा: