एक्स्प्लोर
मुंबईत 5 वर्षांत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण 15 पट
मुंबईत 2013 साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या 92 इतकी होती. मात्र 2017 साली हा आकडा तब्बल 1 हजार 368 पर्यंत पोहोचला आहे.
मुंबई : मुंबईत अल्पवयीन मुली आणि मुलंही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण तब्बल 15 पटीने वाढलं आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत 2013 साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या 92 इतकी होती. मात्र 2017 साली हा आकडा तब्बल 1 हजार 368 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण 5 हजार 56 मुली हरवल्या आहेत किंवा त्यांचं अपहरण झालं, मात्र त्यातील केवळ 4 हजार 686 मुलींचा शोध लागला असून अद्यापही 370 मुलींचा शोधच लागला नसल्याची गंभीर माहिती आहे.
गेल्या पाच वर्षांत 3 हजार 390 मुले गायब झाली होती. त्यातील 3 हजार 131 मुले सापडली असून 259 मुलांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.
अल्पवयीन मुला-मुलींशिवाय मुंबईतून गायब झालेल्या वयस्कांच्या बाबतीतही काही आश्यर्यकारक माहिती समोर आली आहे. 2013 ते 2017 दरम्यान मुंबईतून सहा हजार 510 पुरुष आणि दोन हजार 839 महिला हरवल्या आहेत. त्यातील पाच हजार 322 पुरुष आणि दोन हजार 309 महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं.
याउलट एक हजार 188 पुरुष आणि 530 महिलांचा शोध लागलेला नाही. अशाप्रकारे, 629 अल्पवयीन मुलं आणि एक हजार 718 प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तरी अल्पवयीन मुलं, महिलांच्या गायब होण्यामागे मानव तस्कर टोळ्यांचा हात असल्याचा संशय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement