Versova Bandra Sea Link: वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे पत्र 13 मार्च रोजी लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती केली होती.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आधीच भाजप आणि काँग्रेस आमने सामने असताना आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजू शकतो. वांद्रे-वर्सोवा सीलिंकला (Versova Bandra Sea Link) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.
कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे पत्र 13 मार्च रोजी लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती केली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आणखी दोन मागण्या पूर्ण होतात का? हे पाहावं लागणार आहे.
मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजबांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पहिल्यांदाच या ठिकाणी संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. संभाजी महाराज यांची 366 वी जयंती असल्याने या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे आणि त्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी बोलताना मुंबईतील कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड' नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.