एक्स्प्लोर

'या' कारणांमुळे मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पदव्युत्तर पदवी उमेदवारांची बंधपत्रित सेवा प्रक्रिया थांबवल्याने मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

BMC Hospital Doctors : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (Directorate of Medical Education and Research) पदव्युत्तर पदवी उमेदवारांची बंधपत्रित सेवा प्रक्रिया थांबवल्याने मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी (BMC Hospital Doctros) 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया थांबवल्याने असंतोष निर्माण झाला आहे. बंधपत्रित उमेदवारांची केंद्रीय नियुक्ती लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कामाचा व्याप आधीपासूनच अधिक आहे आणि प्रथम वर्षाची एक बॅच अजूनही आलेली नाही. त्यामुळे सध्या त्याचा भार हा निवासी वैद्यकीय अधिकारी सहन करत आहेत. त्यात संचालनालयामार्फत अजूनही केंद्रीय पद्धतीने बंधपात्रित उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली नसून मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयांमध्ये होणाऱ्या वरिष्ठ निवासी अधिकारी आणि हाऊस ऑफिसर यांच्या नियुक्तीला निर्बंध लावणे चुकीचे आहे. सर्व बाबींचा विचार करता आरोग्य व्यवस्था कोलमडून जाण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती या डॉक्टरांनी व्यक्त केली.

तसंच कोविड कालावधीमध्ये सेवा देणाऱ्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऋण निर्देश भत्ता आणि अनुभव प्रमाणपत्र अजूनही देण्यात आलेलं नाही, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. या परिस्थितीचे अवलोकन करुन तसंच आरोग्य व्यवस्था कायम टिकून राहावी यासाठी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला विनंती करत तीन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

1. बंधपत्रित उमेदवाराची केंद्रीय नियुक्ती लवकरात लवकर सुरु करावी

2. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ निवासी आणि हाऊस ऑफिसर यांच्या निुयक्तीबाबत घेतलेला निर्बंध काढावा.

3. पदव्युत्तर पदवी बंधपत्रित उमेदवारांची संख्या वाढवण्यात यावी

संचालनालयाने या मागण्यांचा विचार करुन लवकरात लवकर त्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती आहे. अथवा मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी 1 ऑगस्ट 2022 पासून कामबंद आंदोलन करुन निषेध आणि असंतोष व्यक्त करतील, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget