एक्स्प्लोर

Mumbai News : चित्र घेऊन ताजच्या दारात उभं रहायचा, आज त्याच्या चित्रांचे ताजमध्ये प्रदर्शन; झोपडपट्टीतल्या मुलाला रतन टाटांनी दिला असा 'ब्रेक'

कुलाबा येथील कफ परेडच्या मच्छिमार नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश मोहिते(सोनू) या 29 वर्षीय गरीब, होतकरू चित्रकाराचं चित्रप्रदर्शन थेट मुंबईतील जगप्रसिद्ध अशा ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत भरले आहे.

मुंबई : आयुष्यात एखाद्या क्षेत्रातले शिक्षण हेच महत्त्वाचे नसते, तर आपल्या अंगात असलेली कला आणि त्यासाठी  केलेले प्रयत्न हे माणसाला एखाद्या क्षेत्रात चांगल्या स्थानावर घेऊन जातात.  मुंबईत बिकट परिस्थितीमुळे  अशाच कमी शिकलेल्या व झोपडपट्टीत राहणाऱ्या एका चित्रकार मुलाचे कष्ट आणि कला , आज त्याला ताजमध्ये एका चित्र प्रदर्शनापर्यंत घेऊन आले आहेत.

कुलाबा येथील कफ परेडच्या मच्छिमार नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निलेश मोहिते(सोनू) या 29 वर्षीय गरीब, होतकरू चित्रकाराचं चित्रप्रदर्शन थेट मुंबईतील जगप्रसिद्ध अशा ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत भरले आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरले आहे. 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं आहे.

कोण आहे निलेश मोहिते?

कुलाबा येथील कफ परेडच्या मच्छिमारनगर झोपडपट्टीत  निलेश मोहिते(सोनू) हा 29 वर्षीय गरीब तरुण राहतो.निलेश मोहिते केवळ नववी पर्यंत शिकला आहे. वडिलांच्या पाठिंब्या अभावी आईनेच चार घरची धुणीभांडी करून निलेश आणि त्याच्या बहिणीचं पालनपोषण केलं. मात्र आईला ही कामं करावी लागू नयेत म्हणून निलेशने रात्रशाळेसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी करून आपला चित्रकलेचा छंदही जोपासतो. शिक्षण अर्धवट  सुटल्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षापासून निलेश मिळेल ते काम करत आपली कला जोपासतोय.

चित्र घेऊन ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा आज ताजमध्ये त्याचे प्रदर्शन 

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे निलेशचे आदर्श. त्यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभर तो ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा. अखेर एक दिवस रतन टाटा यांनी त्याला पाहिलं आणि बोलावून घेतलं. रतन टाटा यांचं विमानात चढतानाचं एक चित्र रतन टाटा यांना भेट म्हणून दिलं. या तरुणाची कला पाहून टाटा प्रभावित झाले. त्याच्याशी बोलताना त्याची बिकट परिस्थिती रतन टाटा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मोठ्या रकमेचा चेक देऊ केला आणि ‘या पैशातून मोठं घर घे,’ असं म्हणाले. पण भेटवस्तू म्हणून दिलेल्या चित्राचे पैसे घेणं निलेशला मान्य नव्हतं म्हणून निलेशने तो चेक नम्रपणे नाकारला. त्याची नम्रता पाहून रतन टाटांनी त्याला विचारलं की, ‘मग तुझ्यासाठी मी काय करू शकतो?’ त्यावर निलेशने चित्रप्रदर्शनासाठी जागा देण्याची आणि तुम्ही त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मागणी केली. अर्थात ती मागणी लगेच मान्य झाली... आणि आज निलेश मोहितेच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईमधील कुलाब्याच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या गॅलरीत पार पडत आहे. 

सर्वांच्या सहकार्याने हा प्रवास घेऊन या चित्रकाराला घेऊन आला आहे

अर्थात हा प्रवास एवढा सोपा नव्हता. या कठीण काळात निलेशला भेटल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर. ज्योतीताईंनी सर्वात प्रथम त्याचा आत्मविशास वाढवला. लोकांशी संपर्क कसा करावा, त्यांच्याशी संवाद कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रदर्शनाची निश्चिती झाल्यावर चित्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेणं हे निलेश समोर एक मोठं आव्हान होतं. पण या संपूर्ण खर्चाची तजवीज त्याची प्रेरणास्थान असलेल्या ज्योतीताईंनी करून दिली आणि संपूर्ण लक्ष चित्रांकडे दे असं सांगितलं. 

यासोबत निलेशच्या आई लता मोहिते यांचं खंबीर पाठबळ त्याला होतंच. शिवाय उद्योगपती मर्जी पारख यांनीही अमूल्य मदत केली. या सर्वांच्या अनमोल मदतीमुळे निलेश आपली चित्रे कॅनव्हासवर उतरवू शकला. झोपडपट्टीतील लाजराबुजरा, कमी शिकलेला, चित्रकलेचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेला परंतु उच्च प्रतिभेची नैसर्गिक देणगी लाभलेला तरुण आज मुंबईमधील कुलाबा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपले चित्रं प्रदर्शन भरवत आहे. अनेक उद्योगपती आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे चित्र प्रदर्शन भरल्यापासून  चांगला प्रतिसाद त्याच्या चित्र प्रदर्शनाला मिळत आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget