Badshah Malik Arrested : मोठी बातमी : लाल चंदनाचा काळा धंदा, देशातील सर्वात मोठ्या चंदन तस्कराला ठोकल्या बेड्या
बादशाह मलिक हा लाल चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी करत होता. त्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी त्याच्या कुर्ल्यातील घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती.
Badshah Malik Arrested : देशातील सर्वात मोठ्या चंदन तस्कराला अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) मुंबईत ही कारवाई केली. बादशहा मलिक (Badshah Malik) असे बेड्या ठोकलेल्या देशातील सर्वात मोठ्या चंदन तस्कराचे नाव आहे. ईडिने त्याच्याविरोधात मनी लॉंड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे.
बादशाह मलिक हा लाल चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी करत होता. त्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी त्याच्या कुर्ल्यातील घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलविले होते. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.
भारतातील सर्वात मोठा लाल चंदन तस्कर
बादशहा मलिक हा महागड्या लाल चंदनाची तस्करी करत होता. भारतातील सर्वात मोठा चंदन तस्कर म्हणून मलिकला ओळखले जाते. त्याचे अंडरवर्ल्डसोबतही संबंध असल्याचे बोलले जाते. एवढेच नाही तर मलिकचा हा लाल चंदनाचा काळा धंदा भारतापूरताच मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरात पसरल्याची माहिती समोर आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) बादशाह मलिकवर 2015 मध्ये रक्त चंदन तस्करीचा गुन्हा दाखल होता. 2015 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने एका आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा शोध घेतला होता. यामध्ये लाल चंदनासारख्या दुर्मिळ आणि अतिशय महाग असलेल्या लाकडाची बाहेरील देशात तस्करी केली जात होती. हे चंदन कंटेनरच्या माध्यमातून निर्यात केले जात होते. मुंबई मधील एका शिपिंग कंपनीसोबत इतर देशांमध्ये 7 हजार 800 मेट्रीक टनापेक्षा जास्त लाल चंदनाची तस्करी केली जात होती.
डीआरआई अधिकारिऱ्यांनी नावा शिवा बंदरावर या कंटेनरला अडवून चौकशी केल्यानंतर त्यांना बादशाह मलिक आणि विजय पुजारीपर्यंत पोहचण्यास मदत झाली होती. विजय पुजारी विरोधात तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो रायलसीमेच्या जंगलात लाल चंदनाची तस्करी करत होता. लाल चंदनाची चीन, जापान, यूरोप आणि अमेरिकेत खूप मोठी किंमत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Heroin Seized : गुजरातमध्ये मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून जप्त केले तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉईन
- Gautam Adani : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा अटकेत, मग गौतम अदानी का ट्रेन्ड होतायंत?
- अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 2 कोटी 40 लाख रुपयांचे ड्रग्ज मुंबईच्या धारावी येथून जप्त