एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BEST Strike : मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, मुंबईकरांना झळ

BEST Strike : सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटाक बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. 

BEST Strike : मुंबईची (Mumbai) दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या (Best Bus) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे (BEST Workers Strike) हत्यार उपसले आहे. सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटाक बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. 

आझाद मैदानात (Azad Maidan) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 तारखेपासून घाटकोपर आगरमधील 280 कंत्राटी कर्मचारी संपावर जात आजाद मैदान गाठले होते. या संपाची या तीव्रता वाढत गेली आणि कंत्राटी तत्वावर असलेल्या मुंबईमधील विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.

जवळजवळ सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मोठ्या संख्येने हे कर्मचारी आझाद मैदानात दाखल होत आहेत. आज बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आहे.

अशा स्थितीमध्ये बेस्ट प्रशासन आता बेस्टच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढवत असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने मुंबईकरांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहेत.

सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 1375 बस गाड्या धावल्या नाहीत

आज 4 ऑगस्ट 2023 रोजी खाजगी बस पुरवठा कंत्राटदार यांच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनास्तव सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 1375 बस गाड्या प्रवर्तित झाल्या नाहीत. आजच्या आंदोलनात SMT, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि switch या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा समावेश आहे. असे असले तरी SMT, मातेश्वरी, हंसा या व्यवसाय संस्थेच्या अनुक्रमे 76, 35 आणि 162 बस गाड्या प्रवर्तित करण्यात आल्या आहेत. उपरोक्त व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटीच्या अटी व शर्ती  प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यांना त्वरित त्यांच्या कामगारांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बेस्ट उपक्रम आपल्या जास्तीत जास्त बस चालकांचा वापर करुन जास्तीत जास्त बस गाडया प्रवर्तित करीत आहेत जेणे करुन प्रवाश्यांना बस सेवा उपलब्ध करता येईल.

संपामुळे 'या' आगारांवर परिणाम

कामबंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अश्या एकूण 20 आगारांच्या बस गाड्या प्रवर्तनावर फरक पडला.

आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये एकूण स्वतःच्या मालकीच्या 1390 आणि  wet lease च्या 1671 अशा एकूण 3061 बस गाड्या आहेत.

बेस्टमध्ये कंत्राटी बसेसचा समावेश का?

बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडलं आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.

हेही वाचा

Best Strike: सलग दुसऱ्या दिवशी 'बेस्ट' विस्कळीत; पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget