एक्स्प्लोर

Mumbai : मुंबईकरांनो, दारू आणि पार्ट्या जरा जपून; थर्टी फर्स्टसाठी 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात, हुल्लडबाजांच्या मुसक्या आवळणार

Mumbai : थर्टी फर्स्टचा मुंबईकरांचा उत्साह लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा आणि पोलीसही सज्ज झाले आहेत. हॉटेल्स, पब्ज, नाईट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Mumbai New Year 2025 : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना, त्यांच्या संरक्षणासाठी 15 हजार पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. तसेच थर्टी फर्स्ट (Mumbai Police on Thirty First) निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबर 'ड्रंक अँड ड्राइव्ह'च्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबविणार आहेत. त्यानुसार, नाकाबंदी आणि झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव 15 हजार पोलीस आणि अंमलदार शहरात तैनात आहेत. त्यांच्या बरोबरच सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून राहणार मुंबईकरांवर नजर

गेट वे ऑफ इंडियासह गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा, मढ, मार्वे, गोराई या चौपाट्या आणि पवई तलाव आदी ठिकाणी पोलीस उपायुक्तांच्या निगराणीखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुसज्ज मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याने तेथे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेकडूनही या काळात विशेष सागरी सुरक्षा कवच पुरवण्यात येणार आहे.

किती फौजफाटा तैनात?

  • मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह आठ अपर पोलीस आयुक्त, 29 पोलिस उपआयुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह  2 हजार 148 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात. 
  • पोलिसांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, आरसीपी प्लाटून, होमगार्ड्स तैनात

ड्रग्ज तस्करीवर नजर

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या तरुणाईसाठी शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यात येईल, या शक्यतेतून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने कंबर कसली आहे. या पथकांनी शहरातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली असून हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्थ्यांवरही लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले आहे.

छेडछाड केल्यास कठोर कारवाई

  • थर्टी फर्स्टच्या रात्री महिलांच्या छेडछाडीबाबत दक्षता
  • शहरात गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात

हेही वाचा:

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Beed Case | कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही- फडणवीसGliding Center Vastav EP 120 | ग्लायडींग सेंटरच्या अडीच हजार कोटींच्या जागेच्या खाजगीकरणाचा प्रयत्नNitin Bikkad on Suresh Dhas:मी वाल्मिक कराडांना कधीच भेटलो नाही,बिक्कडांना फेटाळे सुरेश धसांचे आरोपAPMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Embed widget