एक्स्प्लोर
मुंबईत राष्ट्रवादीचं मोजून पाच मिनिटं आंदोलन!
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी वीज पुरवठा करत असलेल्या क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर 2018 पासून वीज दरात सुधारणा केली आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत राजकीय पक्ष तसंच विरोधक खरंच गंभीर आहेत का असा प्रश्न पडला आहे. कारण मुंबईतील वीज दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाबाहेर मोजून पाच मिनिटंच आंदोलन केलं. राज्यात वीजदारवाढीचा मुद्दा पेटला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एमईआरसीविरोधात आंदोलन केलं. एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांना निवेदन दिलं. त्यानंतर कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेंड सेंटरबाहेर पाच मिनिटं निदर्शनं, घोषणाबाजी केली आणि आंदोलन संपलं. त्यानंतर प्रसारमाध्यम निघत असताना अचानक सचिन अहिर आले त्यांनी प्रसार मध्यमांना प्रतिक्रिया दिली. अदानी कंपनीला झटका, वाढीव दराची दखल घेत आयोगाची नोटीस दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी वीज पुरवठा करत असलेल्या क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर 2018 पासून वीज दरात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरासरी 0.24 टक्के इतकी वीज दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने नियमित दरापेक्षा खूप जास्त रकमेची वीज देयके ग्राहकांना पाठवल्याबाबत वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या वृत्ताची एमईआरसीने गंभीर दखल घेतली आहे. मीटर नोंदीनुसार देयके पाठवण्याऐवजी सरासरी देयके पाठविल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आल्या असून त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. याबाबतची वस्तुस्थिती आणि आणि हाती घेतलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण द्यावं, असे निर्देश एमईआरसीने दिले आहेत.
आणखी वाचा























