एक्स्प्लोर

Mumbai Nashik Highway : खड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, 4-5 किमीच्या रांगा

Mumbai Nashik Highway : मुंबई - नाशिक महामार्गावर खड्याच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Mumbai Nashik Highway : मुंबई - नाशिक महामार्गावर खड्याच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावर खड्यांच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दुसरीकडे खड्डे दुरुस्तीचे काम सोडून पडघा टोल नाक्यावर वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याने चार ते पाच किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हीच वाहतूक कोंडी पाहून  स्थानिक शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी पडघा टोल नाक्यावरील वसुली बंद पाडून वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका केली. तर टोल कायमचाच बंद करावा अशी मागणी  थेट मुख्यमंत्री आणि संबधित विभागाकडे  केली आहे. 

मुंबई - नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे  रस्त्यांची  चाळण  झाली  आहे.  या  रस्त्यावरून  जाताना  प्रवाशांना  वाहतूक  कोंडीचा  सामना  करावा  लागत  आहे. प्रवाशांचा  बराच  वेळ  वाहतूक  कोंडीत  जात  आहे.  त्यामुळे  प्रवाशांचे  हाल  होत  आहेत.  शिवाय  या  रस्त्यावर  अपघाताच्या  घटनाही  घडत  आहेत.  त्यामुळे  एक महिन्यापूर्वी  आमदार  शांताराम  मोरे  यांनी  टोल वसुली करणाऱ्या कंपनीला लेखी पत्र देऊ आदी खड्डे दुरुस्ती करा मग टोल वसूल करा सांगितले होते. खड्डे दुरुस्तीसाठी खुद्द मुख्यमंत्री शिदेंनीही टोल कंपनीच्या मालकाशी संर्पक करून तातडीने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते, असे शिंदे गटाचे आमदार मोरे यांनी पत्रकारांशी  बोलताना सांगितले. मात्र माझ्या लेखी पत्रासह मुख्यमंत्र्याच्या आदेश झुगारून खड्डे जैसे थे ठेवून टोल वसूली केली जात असल्याने टोल नाक्यावरील वसूली बंद पडल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले. 

दरम्यान,  महामार्गवरील  खडयांमुळे  आज  सकाळपासून  प्रचंड वाहतूक  कोंडी होऊन सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मार्गावरील खड्डे   दुरुस्ती  जोपर्यंत  होत  नाही  तोपर्यंत  टोलवसुली  बंद  ठेवावी,  अशी  मागणी  करत आमदार मोरे यांनी पडघा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.  रस्ते  विकास  महामंडळ,  एमएमआरडीए  तसेच  रस्त्यासंदर्भात  असलेल्या  विभागांना  पत्रव्यवहार  करून  गणपतीपूर्वी खड्डे  बुजवण्याचे  लेखी  पत्र  आमदार मोरे यांनी  दिले  होते. मात्र  त्यावर  सर्वच  शासकीय  यंत्रणांचे  दुर्लक्ष  केल्याने  आज   वाहतूक  कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे  पाहून स्वतः आमदारांनी रस्त्यावर उतरून टोल नाका परिसरातील  वाहनांना  वाट  मोकळी  करू  दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget