एक्स्प्लोर

Mumbai Municipal on Covid19 | मुंबई महानगरपालिका 'कोरोनावर' करणार संशोधन

मुंबई महापालिका कोरोना संसर्गावर संशोधन करणार आहे. या अशा संशोधन अभ्यासातून कशा पद्धतीने आणखी नियोजन करावे लागणार आहे. कोणत्या उपाय योजना आहे, ज्यामध्ये बदल करावे लागणार आहेत किंवा नवीन सुधारणा करण्याची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टीची यातून माहिती मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपायामुळे संपूर्ण देशात आणि जागतिक पातळीवर नाव मिळविलेल्या मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या आजारावरील उपचार आणि नियोजनापूरती मर्यादित न राहता त्यांनी कोरोनाच्या संदर्भात संशोधन अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईच्या हद्दीत असणाऱ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असण्याऱ्या वॉर्ड मधील रुग्णसंख्या कमी कशी? या विषयावर संशोधन आणि अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका त्याच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाची आणि आरोग्य विभागाची मदत घेऊन हा अभ्यास करणार आहे. 

यामुळे नेमक्या चुका किंवा आपण कुठे कमी पडत आहोत का? व्यवस्थापन नियोजनात आणखी काही सुधारणा करायची गरज आहे का? या आणि अशा विविध गोष्टीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अशाच पद्धतीने अभ्यासासाठी निरनिराळे विषय शोधले असून त्याकरिता ते मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई आणि विविध खासगी शैक्षणिक संस्था याच्यासोबत बोलणी करून अभ्यास संशोधन करून घेणार आहेत. या अशा पद्धतीने अभ्यास करणारी मुंबई महानगरपालिका पहिली महापालिका असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा आजार हा तात्काळ जाणारा आजार नाही. काही वैद्यकीय तंज्ञानी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवरील आरोग्य विभाग त्या अनुषंगाने पूर्व तयारी करून ठेवत आहेत. या अशाच परिस्थिती उपचारांसोबत आणि व्यस्थापनासोबत या विषयावर अधिक अभ्यास होण्याच्या दृष्टीने संशोधन करून महापालिका आणखी कोणत्या नवीन गोष्टी करण्याची गरज आहे, त्याचा शोध घेणार आहे.  संपूर्ण देशात मुंबई शहरांत कोरोनाचे रुग्ण अधिक होते. त्यामुळे मुंबई शहर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट झाले होते. मात्र, योग्य उपाय योजनांमुळे महापालिकेने वाढती रुग्णसंख्या रोखण्यात यश मिळविले आहे. 

याप्रकरणी, मुबंई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त्त सुरेश काकाणी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगतिले की, "मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्ड निहाय कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पाहत असताना असे लक्षात आले की असे चार वॉर्ड आहेत तेथे लोकवस्ती दाटीवाटीच्या असून गर्दीचा मोठा परिसर ह्या वॉर्डात आहे. मात्र, प्रती लाख लोकसंख्यामागे तेथील कोरोबाधितांची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये बी वॉर्ड (डोंगरी, भेंडी बाजार), सी वॉर्ड (गिरगाव), एम पूर्व (देवनार, गोवंडी), एल वॉर्ड (कुर्ला,चेंबूर) या वॉर्डात ही संख्या कमी का आहे? यामागची काही कारणे आहेत का? ती संशोधन अभ्यासातून शोधून काढणार आहेत. कारण सगळ्या वॉर्डात अशाच पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत होत्या. या अभ्यासातून आणखी काही नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे का? कोरोनाचे उपचार आणि नियोजन याच्यापलीकडे बघण्याची गरज आहे त्याकरिता हा संशोधन अभ्यास करण्यात येणार आहे. या परिसरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला होता का? की आणखी काही कारण आहे याचा शास्त्राच्या आधारावर अभ्यास करण्यात येणार आहे."   

या अशा संशोधन अभ्यासातून कशा पद्धतीने आणखी नियोजन करावे लागणार आहे. कोणत्या उपाय योजना आहे, ज्यामध्ये बदल करावे लागणार आहेत किंवा नवीन सुधारणा करण्याची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टीची या अभ्यासातून माहिती मिळणार आहे. संशोधनामुळे आणखी काही नवीन गोष्टी समोर येतील ज्याचा फायदा कोरोनाचे नवीन प्रतिबंधात्मक उपाय आखण्यासाठी करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget