Corona crisis | 'या' कारणामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई काँग्रेस आमदारात मतभेद
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत काँग्रेस आमदार सोशल मीडिया माध्यमातून जमेल तितकी मदत करत आहे.
मुंबई : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण बेड, ऑक्सिजन, औषधांसाठी मदत मागतात. लोकप्रतिनिधी, मंत्री याना ट्विट केले जातात. पण, मुंबई महापालिकेच्या ट्विटने लोकप्रतिनिधींनी केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मुंबईतील काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतला आहे.
गेल्यावर्षी पासून कोरोना काळात मुंबईतील काँग्रेस आमदार झिशन सिद्यकी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करत आहेत. बेड असो किंवा इंजेक्शन झिशन यांनी अनेकांना मदत केली. पण मुंबई महापालिकेने ट्विटरवरून बेडबाबत मुंबई महापालिकेच्या प्रोटोकॉलची आठवण करून दिली.
मुंबई महापालिकेने वॉर रूमची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून वॉर्डमधील उपलब्ध बेड संख्या आणि कुणाला आवश्यक असल्यास तो मिळवून दिला जातो. लोकप्रतिनिधींनी ह्या व्यवस्थेत हस्तक्षेप करू नये. असाच सल्ला मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडल वरून देण्यात आला आहे. बेडसाठी कोणत्याही अधिकाऱ्यांवर दबाव टाकू नये असेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोरोना संकटात Google आणि Microsoft भारतासोबत; सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्याकडून मदतीचा हात
काँग्रेस आमदार झिशन सिद्यकी यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. महापालिकेचा हा कसला अहंकार आहे अशी टीका आमदार सिद्यकी यांनी टीका केली आहे. नागरिकांना मदत मिळत असती तर आम्हाला लोकांनी सोशल मीडियावर मदत का मागितली असती? असा सवाल आमदार झिशन सिद्यकी यांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत लोकप्रतिनिधी, एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आहेत. अशा वेळी कोणी मदत करत असेल तर आक्षेप घेणं योग्य नाही अशी भूमिका कोंग्रेस आमदार झिशन सिद्यकी यांनी मांडली आहे.
फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव घेऊन सलमानने घेतला मदतकार्याचा आढावा
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत काँग्रेस आमदार सोशल मीडिया माध्यमातून जमेल तितकी मदत करत आहे. अशा वेळी या मदतीला चुकीचं ठरवलं जात असल्याने काँग्रेस आमदाराने ट्विट माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकूणच जनतेला मदत करण्यावरून ही वादाचे चित्र आहे.