एक्स्प्लोर

..म्हणून मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीसाठी सुचवलं : उद्धव ठाकरे

मुंबई : मनापासून मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतांच्या नावाचा पुनरुच्चार केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. मनापासून मोहन भागवतांचं नाव सुचवलं! मनपासून मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं आहे. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं तर ते नरेंद्र मोदींचे गुरु आहेत, असं स्वत: मोदींनी सांगितलं. त्यांना पद्मविभूषण दिलं. मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल. एकमेकांची मनं जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला हिंदूराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक असतील का, ह्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, का नसावेत? इतर राज्यपाल निवडणूक पाहा. इतरत्र ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो, मग देशाचं नेतृत्त्व त्यांनी करायला हरकत नाही. शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केलं पाहिजे उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेतकरी कायम परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केलं पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांचे धन्यवाद." "आत्महत्याग्रस्त जिह्यासाठी मदत द्या, अशी बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे." शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे, पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच सरकारने दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे आणि मला तशी अपेक्षा आहे." पेट्रोलचे दर देशभरात समान असावेत पेट्रोलवर व्हॅट लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. "जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल दर खाली आले आहेत. तरीदेखील आपल्या देशात दर चढेच आहेत. जर समान कर लावणार असू तर देशभरातील दर समान असायला हवेत, अशी माझी अपेक्षा आहे. इतर राज्यात आपल्या सोयीने दर लावतात. त्यामुळे दरवाढ होते. जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकलं जात असेल तर ते चूक आहे," असं ते म्हणाले. राणे आणि भाजप, दोघांना शुभेच्छा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही. त्या दोघानांही शुभेच्छा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तो विषय टाळला.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget