(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, मेट्रो सेवा विस्कळीत; मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी
Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. मेट्रोतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. मेट्रो प्रशासनाने बिघाड दुरुस्त केल्याचा दावा केला आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती.
सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही मार्गावरील मेट्रो वाहतूक थांबवण्यात आली. प्रवाशांना नजीकच्या स्थानकात उतरवण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
SERVICE UPDATE |
— Mumbai Metro (@MumbaiMetro01) April 26, 2023
Services are delayed owing to a technical fault. Appreciate support of our patrons while efforts are on to resume services at the earliest.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बिघाडामुळे मनस्ताप सहन करावा लागला. इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्ट बस, रिक्षाचा पर्याय वापरावा लागला. त्याच्या परिणामी बसमधील गर्दी आणखीच वाढली. तर, रिक्षा मिळवण्यासही अडचणी निर्माण झाल्या.
मेट्रो प्रशासनाने 5.40 वाजण्याच्या सुमारास ट्वीट करून वाहतूक सुरळीत केली असल्याचा दावा केला. मात्र, जवळपास तासभर वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले. या बिघाडामुळे मेट्रोच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
मुंबई मेट्रोतील तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रोचे तिकीट काढलेले असताना बस, रिक्षा आणि लोकलसारख्या पर्यायांचा वापर करावा लागला असल्याने मुंबईकरांनी मेट्रो प्रशासनावर ताशेरे ओढले.
Passengers are deboarded at airport road station with no clarity whether services will run or not
— MumBoy (@save_our_mumbai) April 26, 2023
मेट्रो तांत्रिक बिघाडाबद्दल माहिती दिल्यानंतर मेट्रो स्थानकांवर अडकलेले प्रवासी मेट्रो प्रशासनावर चांगलेच बरसले. सोशल मीडियावरुन मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर काहींनी मेट्रो प्रशासनाच्या काही तांत्रिक बिघाडावरुन सुनावले. 'मुंबई मेट्रो'ने स्वत:चे नाव बदलून 'मुंबई लेट हो' ठेवावे असा सल्ला काही संतप्त प्रवाशांनी दिला.
Change your name from Mumbaimetro to *"Mumbai Late Ho"*
— Zamir (@Zamir44093619) April 26, 2023
मुंबई मेट्रोच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. मेट्रो प्रवाशांनी ऑटो रिक्षा प्रवासाचा पर्याय निवडल्याने घाटकोपर-अंधेरीदरम्यानची वाहतूक कोंडी वाढली.
SERVICE UPDATE |
— Mumbai Metro (@MumbaiMetro01) April 26, 2023
Train operation has resumed and services are being regularised as per schedule. Regret the inconvenience. #HaveANiceDay