Mumbai Metro 7 : 'मुंबई मेट्रो 7'चे दर ठरले! एमएमआरडीएने सांगितले...
Mumbai Metro 7 : येत्या काही दिवसांमध्ये मुंबई मेट्रो 7 चा पहिला टप्पा सुरू होणार असून किमान प्रवास भाडे 10 रुपये असणार आहे.
Mumbai Metrol 7 : लवकरच सुरू होणाऱ्या मुंबई मेट्रो 7 च्या तिकिटाचे दर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने जवळपास निश्चित केले आहे. मुंबई मेट्रो 7 च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. या मार्गावरील फेज 1 म्हणजेच दहिसर ते आरे कॉलनी दरम्यानची मेट्रो वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
मेट्रो 7 चे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. मुंबई मेट्रो 7 च्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व परवानगी, प्रमाणपत्र मिळाले की एका महिन्यात मुंबई मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या फेजमध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी असणार असून 35 किमीचा मेट्रो मार्ग आम्ही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रो 2A देखील अंतिम टप्प्यात आहे. 'मुंबई मेट्रो 7' मेट्रो सोबत या मार्गावरील फेज 1 वरील वाहतूक सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
10 मेट्रो गाड्या आणि मनुष्यबळ सज्ज
‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 10 मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे.
'मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.
इतर संबंधित बातमी:
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास करता येणार