एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द
पावासाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पावासाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार होता.
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही दिशेने, तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान 11.10 ते 4.10 या वेळेत ब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटी-पनवेल/ बेलापूर/ वाशी मार्गावरील अप-डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटे या वेळेत अप-डाऊन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement