एक्स्प्लोर
हिट अँड रन : कारच्या धडकेत मेडिकल इंटर्न व्हेंटिलेटरवर
अपघातानंतर जखमी दीपालीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी शीखाने पळ काढला. एका व्यक्तीने पाठलाग करुन तिला पुढच्या सिग्नलवर गाठलं.
मुंबई : मुंबईतील नायर रुग्णालयात इंटर्न म्हणून काम करणाऱ्या तरुणीला अपघात झाला आहे. दीपाली लहमाटे या तरुणीला मरिन ड्राईव्ह भागात एका कारने धडक दिली असून तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी महिला कारचालकाला जामीन मिळाला.
दीपाली ही नायर रुग्णालयाच्या दंतमहाविद्यालयात इंटर्न म्हणून काम करत होती. दीपालीच्या एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेल्या भावाचं जे.जे. जिमखान्यात कॉन्व्होकेशन होतं. त्यासाठी गेल्या शनिवारी, म्हणजे 24 मार्चला ती पायी चालली होती.
तारापोरवाला मत्स्यालयजवळ असलेल्या सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर दीपाली रस्ता ओलांडत होती. त्यावेळी लाल सिग्नल असतानाही एका पांढऱ्या होंडा सिटी कारने सिग्नल तोडला आणि दीपालीला जोरदार धडक दिली.
एफआयआरमध्ये असलेल्या माहितीनुसार शीखा झवेरी नामक महिला संबंधित कार चालवत होती. नेपियन्सी भागात राहणारी शीखा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अपघाताच्या वेळी तिच्यासोबत गाडीत तिची धाकटी मुलगीही होती. दुर्दैवाने त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
अपघातानंतर जखमी दीपालीला वैद्यकीय मदत करण्याऐवजी शीखाने पळ काढला. एका व्यक्तीने पाठलाग करुन तिला पुढच्या सिग्नलवर गाठलं.
काही पादचाऱ्यांनी दीपालीला भाटिया रुग्णालयात दाखल केलं. शनिवारपासून दीपाली लाईफ सपोर्ट सिस्टमवर असून तिला अद्याप शुद्ध आलेली नाही. दुसरीकडे, आरोपी महिलाचालक जामिनावर बाहेर आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील किंवा कोणालाही या घटनेबद्दल माहिती असेल, तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन 'नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज स्टुडंट असोसिएशन'ने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. #JusticeForDeepali आणि #ThinkAndDrive अशा हॅशटॅगसह ही पोस्ट शेअर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement