एक्स्प्लोर
खुद्द महापौरांचीच गाडी नो पार्किंग झोनमध्ये, महाडेश्वरांना दंड ठोठावणार?
महापालिका आयुक्तांनी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. यानुसार वाहनतळाच्या 500 मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास 5 ते 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

मुंबई : मुंबईतील नव्या पार्किंग पॉलिसीचं खुद्द महापौरांनीच उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. विलेपार्ल्यातील मालवणी आस्वाद हॉटेलबाहेर नो पार्किंग झोनमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी पार्क केली होती. परंतु त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही.
महापालिका आयुक्तांनी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. यानुसार वाहनतळाच्या 500 मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास 5 ते 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या नव्या पार्किंग पॉलिसीनुसार महापौरांच्या गाडीलाही 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर उद्यापासून दंडात्मक कारवाई, दुचाकीसाठी पाच हजारांचा दंड
एकीकडे या पॉलिसीमुळे मुंबईकर जेरीस आले आहेत. वाहनतळ नाहीत, आहेत ते सोईचे नाहीत. त्यामुळे जर नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केल्यास मुंबईकरांना दंड ठोठावण्यात येतो. मात्र आता खुद्द महापौरांची गाडीच नो पार्किंग झोनमध्ये पार्क असूनही त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे. तसंच पावती आल्यास दंडाची रक्कम भरु, असंही महापौरांनी सांगितलं.
बेकायदेशीर पार्किंगचा नवा दंड म्हणजे महापालिकेची खंडणी, हायकोर्टात याचिका
पार्किंगचे सध्याचे दर
महापालिकेच्या वाहनतळांवर सध्या तीन ते चार चाकी वाहनांना एक तास ते 24 तासांसाठी 25 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत, दोन चाकी वाहनांना 10 ते 35 रुपये, ट्रक - 35 ते 205 रुपये, रिक्षा-टॅक्सी - 25 ते 80 रुपये आणि बससाठी 25 ते 145 रुपये वाहनतळ शुल्क घेतले जाते. मुंबईतील वाहनतळांच्या शुल्कानुसार वाहनतळ शुल्काचे दर काही प्रमाणात कमी-जास्त आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























