एक्स्प्लोर
Advertisement
काम सुरु करा, अन्यथा कारवाई करु, महापौरांचा डॉक्टरांना इशारा
मुंबई: जर निवासी डॉक्टरांनी संध्याकाळपर्यंत काम सुरु केलं नाही, तर नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला.
निवासी डॉक्टर आणि महापौरांची आज बैठक झाली. या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या मान्य झाल्या, मात्र तरीही ही बैठक निष्फळ ठरली. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळं डॉक्टरांनी सामूहिक रजा मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान महापौरांसोबतच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या काही मागण्यांना तात्काळ मंजुरी देण्यात आली. तरीही डॉक्टरांनी सामूहिक रजेचा पवित्रा कायम ठेवल्यामुळं रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत.
डॉक्टरांचा मागण्या मान्य
- महापौरांसोबतच्या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या.
- केवळ २ नातेवाईकांना पेशंटसोबत प्रवेश दिला जावा.
- हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टीम लावण्यात यावी (ही मागणी बैठकीतच तात्काळ मंजूर करण्यात आली)
- यासोबत हॉस्पिटलमध्ये पास सिस्टीमही लागू करण्यात येणार आहे.
- मुंबई महापालिका प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार
- सध्या ४३२ सुरक्षारक्षक सर्व महापालिका हॉस्पिटलमध्ये मिळून आहेत.
- यात वाढ करुन शनिवारी ४०० पोलिसांची नेमणूक करणार, तर, नंतर ही संख्या ७०० पर्यंत वाढवणार.
- डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० ची परिणामकारक अंमलबजावणी करा
- डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
- निवासी डॉक्टरांना सुरक्षीत वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
- सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement