ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे मुंबई सतर्क, आढावा घेण्यासाठी अचानक एअरपोर्टवर पोहचल्या महापौर किशोरी पेडणेकर
प्रवाशांची तपासणी कशा पद्धतीने होते, याचा आढावा मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी घेतला.
Kishori pednekar on omicron : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रानेही सावध पवित्रा घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचपणी केली जात आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव होऊ नये यासाठी तयारी करण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. प्रवाशांची तपासणी कशा पद्धतीने होते, याचा आढावा मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोरी पेडणेकर यांनी घेतला. सोमवारी रात्री मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर यांनी अचनाक मुंबई विमानतळाला भेट दिली. यावळी मुंबई विमानतळावरील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढवा घेतला.
एबीपी न्यूजसोबत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘बीएमसी कर्मचारी आणि एअरपोर्ट अथॉरिटी नियमांचं व्यवस्थित पालन करत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांमुळे समाधानी आहे. मुंबईकरांनी घाबरु नये. दक्षिण आफ्रिकामधून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या तपासणीसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अद्याप एकही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही, हे दिलासादायक आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वोत्परीने प्रयत्न केले जात आहेत. ज्याप्रमाणे तिसऱ्या लाटेला हरवलं, तसेच या नव्या विषाणूलाही हरवूयात.’
सोमवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी अचानक मुंबई विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उप महापौर अँड. सुहास वाडकरही उपस्थित होते. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी (Corona Test) कशा पद्धतीने करण्यात येते याची त्यांनी पाहणी केली. राज्यातील कोरोना रग्णसंख्यामध्ये घट होत असतानाच नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी एक हजारांच्या आसपास दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आल्याची माहिती दिली होती. या सर्वांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
Mumbai Mayor Kishori Pednekar takes stock of measures being taken at Mumbai airport against #Omicron variant of coronavirus
— ANI (@ANI) November 29, 2021
"Authorities have told me that they test every passenger on arrival & send them to quarantine... So far, there's no case of Omicron in Mumbai," she says pic.twitter.com/b0x7o9EYiI