एक्स्प्लोर
मोबाईल चोराचा पाठलाग करताना हलगर्जी, तरुण लोकलखाली जखमी
मोबाईलमध्ये लक्ष असल्याच्या संधीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी पुतण्याच्या हातून मोबाईल खेचून पळ काढला. त्याचा पाठलाग करणारा काका लोकलखाली येऊन जखमी झाला

मुंबई : तुम्ही प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहताना मोबाईलवर वेळ घालवत असाल, तर सावध राहा! मोबाईलमध्ये लक्ष घालून बसणं तुम्हाला कसं महागात पडू शकतं, हे बोरिवली स्टेशनवर समोर आलं. मोबाईल चोराचा पाठलाग करताना तरुण लोकलखाली येऊन गंभीर जखमी झाला.
बोरिवलीहून सुरतला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी 16 जानेवारीला रात्री दहा वाजताच्या सुमारास काका-पुतण्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर वाट बघत बसले होते. काकाच्या बाजूला बसलेला पुतण्या मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी पुतण्याच्या हातून मोबाईल खेचून पळ काढला.
मोबाईल खेचून चोराने ट्रॅकवर उडी घेतली. मात्र चोराला पकडण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या लोकलकडे काकाचं दुर्लक्ष झालं आणि ते लोकलखाली अडकले. त्यातच चोराने काकाला लोकलखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काका गंभीर जखमी झाले असून कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बोरिवली स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अशाच प्रकारे मोबाईल चोरण्यासाठी आलेल्या आरोपीचा डाव फसला आणि त्यांना काल पोलिसांनी अटक केली. हर्षद शेख, परमेश्वर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























