(Source: ECI/ABP News/ABP Majha)
15 सप्टेंबरपासून 11 धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत धावणार; दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Mumbai Local: मुंबईतील (Mumbai News) दादर रेल्वे स्थानकामधील रेल्वेच्या 11 धिम्या लोकल दादरऐवजी आता परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Local Updates: दादर स्टेशनमधील (Dadar Station) प्लॅटफॉर्म एकची रुंदी वाढवण्यात येणार आहे. अशावेळी गर्दीचं नियोजन करण्यासाठी दादर लोकलच्या 11 फेऱ्या परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून निघते. पण दादर हे सर्वात गर्दीचं स्टेशन असल्यामुळे आणि 15 सप्टेंबरपासून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार असल्यानं 15 सप्टेंबरपासूनच दादर लोकल परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी 27 मीटर आणि रुंदी सात मीटर आहे. आता ही रुंदी साडेदहा मीटर केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यांत प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईतील (Mumbai News) दादर रेल्वे स्थानकामधील रेल्वेच्या 11 धिम्या लोकल दादरऐवजी आता परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या लोकल दादरच्या फलाट क्रमांक दोनवर येतात. मात्र त्या 15 सप्टेंबरपासून परळपर्यंत धावतील आणि तेथूनच डाऊन दिशेकडे मार्गस्थ होतील. का हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोणत्या लोकल फेऱ्यांमध्ये बदल?
- ठाणे-दादर लोकल : सकाळी 8.07 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सकाळी 8.13 वाजता परळला पोहोचेल आणि सकाळी 8.17 वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.
- टिटवाळा-दादर लोकल : सकाळी 9.37 वाजता दादरला पोहोचणारी लोकल परळला सकाळी 9.42 वाजता पोहोचेल आणि कल्याणसाठी सकाळी 9.45 वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.
- कल्याण-दादर लोकल : दुपारी 12.55 वाजता दादरला पोहोचणारी लोकल दुपारी 12.58 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी दुपारी 1.01 वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी 5.51 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 5.54 वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी 5.56 वाजता परळहून डोंबिवलीसाठी निघेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी 6.10 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 6.13 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी 6.15 वाजता सुटेल.
- डोंबिवली-दादर लोकल : सायंकाळी 635 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 6.38 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी 6.40 वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी 7.03 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 7.06 वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी 7.08 वाजता परळवरून कल्याणसाठी सुटेल.
- डोंबिवली-दादर लोकल : सायंकाळी 7.39 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 7.42 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी सायंकाळी 7.44 वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी 7.49 वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी 7.52 वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी 7.54 वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.
- कल्याण-दादर लोकल : रात्री 8.20 वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री 8.23 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी रात्री 8.25 वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : रात्री 11.20 वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री 11.23 वाजता परळला पोहोचेल आणि रात्री 11.25 वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.