एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 16 जूनला माटुंगा ते मुलुंड मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल

Mumbai Railway Trains Updates: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक. उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या गाड्यांचे टाईमटेबल. सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत १६.०६.२०२४ (रविवार) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १६ जूनला रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक (Railway Mega block)  सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग  सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०:२५ ते दुपारी २:४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०:५० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

डाऊन धिम्या लाइनवरील लोकल ट्रेनचे वेळापत्रक

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०:२० वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून दुपारी ३:०३ वाजता सुटणार आहे.

अप धिम्या लाइनवर अंबरनाथ लोकल शेवटची

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल. जी सकाळी ११:१० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल सीएसएमटी येथे दुपारी ३:५९ वाजता पोहोचेल.अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत

पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०:१८ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल सीएसएमटी मुंबई येथून दुपारी ३:४४ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक कशी असणार?

सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०:०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे. सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटणार आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

आणखी वाचा

मोटरमनच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना फटका, नालासोपारा लोकल ट्रेन चक्क स्टॅापिंग यलो पट्टीच्या पुढे थांबली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Embed widget