एक्स्प्लोर

Mumbai Local Train Accident: मुंबईतील रेल्वे अपघात प्रकरणात ट्विस्ट, मध्य रेल्वेच्या पीआरओंनी वेगळीच शंका बोलून दाखवली, 8 जण खाली कसे पडले?

Mumbai Local Train Accident: दरम्यान या घटनेबाबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका महिलेने माहिती देताना काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होती असं कळतंय, यासंदर्भात देखील माहिती घेत आहोत आणि तपास केला जात आहे

Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway Train Accident) मुंब्रा स्थानकाजवळ आज ( सोमवारी 9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी यांच्या बॅगा घासले गेले. यामुळे 8 प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. लोकल ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले आहेत. दरम्यान या घटनेबाबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका महिलेने माहिती देताना काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होती असं कळतंय, यासंदर्भात देखील माहिती घेत आहोत आणि तपास केला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दिली आहे.

फूटओव्हरवर लोकं उभे असताना पडण्याची पहिलीच घटना

अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ज्यात दोन्ही बाजूनं लोकल जात असताना फूटओव्हरवर लोकं उभे असताना पडण्याची पहिलीच घटना आहे. सीसीटीव्ही होते की नाही, लोकलमध्ये गर्दी किती होती? यासंदर्भात माहिती घेतली जाऊ शकते. चौकशी यासंदर्भातली नक्कीच होईल. अपघातग्रस्तांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणं महत्त्वाचं होते. काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होती असं कळतंय, यासंदर्भात देखील माहिती घेत आहोत आणि तपास केला जात आहे, ह्या घटनेचा कोणताही परिणाम रेल्वे वेळापत्रकावर झालेला नाही, अशी माहिती देखील मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. 

घटनेतील जखमी यांची तिघांची ओळख पटलेली आहे. दोन लोकल एकाच वेळी एकमेकांच्या विरोधी जात असताना एकमेकांच्या बॅगा लागल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली पडली. 

रेल्वे स्टेशनवरील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार अनुभव

सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आम्ही मुंब्रा स्थानकावर होतो. त्यावेळी लोकलमधील प्रवासी एकामागोमाग रेल्वे ट्रॅकवर पडत होते. मी आतापर्यंत असा थरारक अपघात कधीच बघितला नव्हता, अशी माहिती मुंब्रा रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशाने सांगितले.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget