(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, तर हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत; कसं असेल आज लोकलचं वेळापत्रक?
Mumbai Local Mega Block : आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत असणार आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे हार्बर लाईनवरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block Updates: आज रविवार... मध्य रेल्वेच्या मार्गांवर आजा मेगाब्लॉक (Mumbai Local News) घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. मात्र हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक आज सुरळीत राहणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात येणार आहे. खारघरमध्ये (Kharghar) आज या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीच आज हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (Mega Block) रद्द करण्यात आला आहे.
रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे हार्बर लाईनवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड (Mla Prasad Lad) यांनी देखील हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांना पत्र लिहले होते. डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान समारंभास येणाऱ्या अनुयायींच्या सोयीसाठी रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करावा अशी मागणी लाड यांनी केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी देखील मेगाब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत असल्याचं सांगत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनने दिलगीर व्यक्त केली आहे.
आज हार्बर लाईनवरील वाहतूक सुरळीत
हार्बर लाईनवर यापूर्वी जाहीर केलेला मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार नाही.
रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block) रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. मात्र, मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे.