एक्स्प्लोर
कोठारी मॅन्शनमध्ये काळबादेवी आग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली...
मुंबईत फोर्ट परिसरातील कोठारी मेन्शन या इमारतीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे.
मुंबई : मुंबईत फोर्ट परिसरातील कोठारी मेन्शन या इमारतीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे. सुदैवाने काळबादेवी आग घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.
कोठारी मेन्शनला लागलेल्या आगीनंतर इमारतीचा अर्धा हिस्सा अचानक कोसळला. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी थोडक्यात बचावले. दोन फायरमन किरकोळ जखमी झाले आहेत.
एक फायर इंजिन आणि स्पेशल अप्लायंसवर इमारतीचा काही भाग कोसळला.
कोठारी मेन्शन ही इमारत म्हाडा सेस इमारत होती. म्हाडाने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत कुणीही रहिवासी राहत नव्हते. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरु आहे.
इमारतीचा उरलेला अर्धा भाग कधीही कोसळू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
मे 2015 मध्ये मुंबईतील काळबादेवीमध्ये गोकुळ निवासमधील इमारतीत आग लागली होती. बचावकार्य करत असताना अचानक इमारत कोसळल्यानं संजय राणे आणि महेंद्र देसाई या अधिकाऱ्यांना वीरमरण आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement