एक्स्प्लोर

मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक, शेवटची लोकल रात्री 11.30 वाजता

मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे काही काळ हाल होणार आहेत.   कुर्ला येथील कसाईवाडा भागात रेल्वेमार्गावरुन पूर्व-पश्चिम जाणारा पादचारी पूल बांधण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री 12.15 मिनिटांनी सुरु होणाऱ्या य ब्लॉकचं काम रविवारी सकाळी 6.15 मिनिटांपर्यंत सुरु राहिल.   मध्य रेल्वेवरील या जम्बो मेगाब्लॉकमुळे उद्या सकाळी मुंबईत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून आज शेवटची लोकल रात्री 11.30 मिनिटांनी सुटेल. हार्बर मार्गावरील शेवटची गाडी 11.38 वाजता सुटेल. त्यानंतरच्या काही गाड्या कुर्ला स्टेशनवरुन तर सीएसटी-खोपोली ही गाडी ठाणे स्टेशनवरुन सुटणार आहे. सीएसटीहून पहिली गाडी रविवारी पहाटे 5.52 वाजता सुटेल.   या जम्बो मेगाब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील तब्बल 24 आणि हार्बर मार्गावरील 28 सेवा रद्द असतील. त्यामुळे उपनगरी प्रवाशांच्या वाट्याला खडतर प्रवास येणार आहे.   रविवारी रद्द केलेल्या गाड्या   पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस   मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस     लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बदल   - एर्नाकुलम-मुंबई एसी स्पेशल ट्रेन रविवारी फक्त ठाण्यापर्यंतच धावेल   - भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावेल   - मंगळुरु-मुंबई एक्स्प्रेस फक्त दादरपर्यंतच धावेल   - साईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर दादरपर्यंतच धावेल   - अमरावती-मुंबई एक्स्प्रेसही दादर स्थानकातच थांबेल   - गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादरपर्यंत धावेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget