Vada Pav : 'मुंबईचा वडापाव' जगात भारी; जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या स्थानी
Mumbai Vada Pav : मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव 13 व्या क्रमांकावर आहे.
Mumbai Iconic Street Food Vada Pav : मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारा व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारा परदेशी व्यक्ती, पण तुम्हाला वडापावबाबत नक्की माहिती असते. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे.
जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापाव
मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. टेस्ट ॲटलसच्या (Taste Atlas) जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे.
मुंबईच्या वडापावला जागतिक मान्यता
जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावं स्थान मिळालं आहे. या यादीत तुर्कीचं टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचं बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे.
All about 100 best-rated sandwiches in the world at the link: https://t.co/OS7SzEZhKN pic.twitter.com/IybKxsXFpu
— TasteAtlas (@TasteAtlas) February 27, 2023
टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली. टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे.
मुंबई आणि वडापावचं नातं
एक पाव त्यामध्ये गरमागरम तेलातून काढलेला, कुर्रकुरीत, थोडा लुसलुशीत आणि चविष्ट असलेला वडा त्यावर हलकीशी लसणाची चटणी तसेच तिखट चटणी आणि मिरचीबरोबर हा वडापाव (Vada Pav) जेव्हा तोंडात जातो, तेव्हा अर्थातच त्याची चव जीभेवर रेंगाळल्याशिवाय राहात नाही. हे वडापावचं वर्णन फक्त वाचूनच तुमच्याही जीभेला पाणी सुटलं असेल. खवय्ये बाजूला रस्त्याने जाताना केवळ वासावरुन त्या वडापावची चव ओळखतात. इतकंच काय तर, मुंबईतला हा वडापाव परदेशातही प्रसिद्ध झाला आहे.
हेही वाचा
World Vada Pav Day 2022 : मुंबईच्या वडापावची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं