एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईत पाऊस पडला, महापौरांनी नाही पाहिला!

अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असलं तरी मुंबई कुठे तुंबली आहे? असा उलट प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विचारत आहेत. मुंबई सुरळीतच आहे, कुठेही तुंबलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

मुंबई : मुंबईत दिवसभर पावसाची उघडझाप होत असली, तरी पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील दादर, हिंदमाता, परेल, सायन यासारख्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातच सकाळपासून लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला. येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय 5 जुलैपर्यंत पालघर, रायगड, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे शहर, घोडबंदर रोड, तलावपाळी परिसर, वागळे इस्टेट, कळवा , मुंब्रा अशा सर्वच ठिकाणी चांगला पाऊस बरसला. काही सखल भागात पाणी साचलं तर पूर्व द्रुतगती मार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी दिसली. याचा फटका रेल्वेसेवेलाही बसला. नियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतही काही भागात पाणी साचलं. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने खारघरच्या सेक्टर 10 मधील काही रस्त्यांना तलावाचं रुप आलं होतं. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या सीबीडी बेलापूरच्या कोकणभवनलाही पावसाचा तडाखा बसला. कोकण किनारपट्टीजवळच्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. एकीकडे सुर्या आणि वैतरणा या मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या. तर दुसऱ्या बाजूला जव्हार मोखाडा या टंचाईग्रस्त तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. वसई विरार क्षेत्रात रात्रीपासून पावसाचा जोर जास्त होता. सखल भागातील सोसायट्यांमधील पाणी ओसरायचं नाव घेत नव्हतं. नालासोपारा आचोले रोडवर असलेली पारस सोसायटी, विरारची श्रीराम नगर इमारत अशा काही ठिकाणी सतत चौथ्या दिवशी पाणी साचलेलं होतं. महापौरांना तुंबलेली मुंबई दिसेना अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असलं तरी मुंबई कुठे तुंबली आहे? असा उलट प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विचारत आहेत. नालेसफाईची कामं चांगली झाली आहेत. काही तुरळक ठिकाणी पाणी साचलं आहे. या व्यतिरिक्त मुंबई सुरळीतच आहे, कुठेही तुंबलेली नाही, असा दावाही त्यांनी केला. महापालिका उपआयुक्तांनीही महापौरांची री ओढत मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला. फक्त काही ठिकाणी पाणी जमा झालं आहे. प्रसारमाध्यमांच्या पाणी तुंबण्याच्या व्याख्या चुकीच्या असल्याचं मुंबई उपआयुक्तांचं म्हणणं आहे. सखल प्रदेशात पाणी साचतंच, असंही ते सांगायला विसरले नाहीत. अतिवृष्टीचा इशारा आतापर्यंत महाराष्ट्रात पुरेसा पाऊस पडला नसला तरी येत्या 5 जुलैपर्यंत उत्तर कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि अलिबाग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Embed widget