एक्स्प्लोर
Advertisement
26/11 हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालविरुद्धच्या खटल्याला स्थगिती
जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल हा 26/11 च्या खटल्यातील भारताच्या अटकेत असलेला एकमेव आरोपी आहे.
मुंबई : 26/11 ला मुंबईतील ताज हॉटेलसह अन्य ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अबु जुंदाल विरोधातील खटल्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अबु जुंदालशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्र बचावपक्षाला देण्यास नकार देत, हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर यावर शुक्रवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने 11 जूनपर्यंत यावर सुनावणी तहकूब करत तोपर्यंत सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुरु असलेल्या 26/11 च्या खटल्याला स्थगिती दिली आहे.
जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल हा 26/11 च्या खटल्यातील भारताच्या अटकेत असलेला एकमेव आरोपी आहे. या संपूर्ण हल्ल्यादरम्यान पाकिस्तानातील कंट्रोल रुममध्ये राहून नियंत्रण ठेवण्यात, इथल्या अतिरेक्यांना सूचना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
तपास यंत्रणांनी त्याला सौदी अरेबियात अटक करुन भारतात आणलं होतं. त्यावेळी त्याच्याकडील पाकिस्तानचा पासपोर्ट आणि अन्य कागदपत्र जप्त केल्याची तपास यंत्रणेची माहिती आहे. मात्र हा दावा सपशेल खोटा असल्याचा आरोप करत बचावपक्षाने ही कागदपत्र पुरावा म्हणून सादर करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती.
ही विनंती मान्य करत महिन्याभरापूर्वी दिल्ली पोलिसांना अबु जुंदालच्या सौदी अरेबिया ते दिल्ली विमान प्रवासाची कागदपत्र बचावपक्षाला देण्यात यावीत, असे आदेश विशेष न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले होते. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला दिल्ली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध लोकांचा बळी गेला होता तर 300 लोकं जखमी झाले होते. याशिवाय कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement