एक्स्प्लोर
परवानगीविना गणपती मंडप उभे राहतातच कसे? हायकोर्टाने झापलं
बेकायदेशीरपणे उभारलेल्या या गणपती मंडपात सजावटीची कामं दिवसरात्र सुरु आहेत. गणपती मंडपात बसण्याची वाट पाहात आहात का? कारवाई करणार कधी? असा उद्विग्न सवाल न्यायालयानं विचारला.
मुंबई : गणेशोत्सव आठवड्याभरावर आला असताना मुंबई आणि आसपासच्या भागातील रस्त्यांवर बेकायदेशीर मंडपांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हं आहेत. परवानगी नसताना बेकायदेशीर मंडप उभेच कसे राहतात? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं उल्हासनगर महापालिकेला बेकायदेशीर मंडपांवर ताबाडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बेकायदेशीरपणे उभारलेल्या या गणपती मंडपात सजावटीची कामं दिवसरात्र सुरु आहेत. गणपती मंडपात बसण्याची वाट पाहात आहात का? कारवाई करणार कधी? असा उद्विग्न सवाल न्यायालयानं विचारला.
हिराली फाऊंडेशनच्या वतीनं दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी यावेळी रस्त्यांवर उभारलेल्या बेकायदेशीर मंडपांचे फोटो न्यायालयात सादर केले. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना पालिकेनं या मंडळांना कोणतीही परवानगी दिली नसल्याचं कबूल केलं.
गणेशोत्सव आठवड्याभरावर आल्यानं यावर्षीपुरती परवानगी देण्याची विनंती उपस्थित मंडळांच्या वतीनं करण्यात आली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करता ताबडतोब कारवाईचे निर्देश देत 22 ऑगस्टला होणाऱ्या मुख्य याचिकेवरील सुनावणीत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं उल्हासनगर महापालिकेला दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement