एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबई मेट्रो-3 साठी भुयारच्या खोदकामास हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

मेट्रो 3 मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत जे एन पेटीट या 119 वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई : मेट्रो 3 प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई हायकोर्टाने दोन आठवड्यांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. जे एन पेटीट ग्रंथालय आणि उद्यानाच्या आसपासच्या भागात भुयाराचं खोदकाम करु नये, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक याचिका या संस्थेने मुंबई हायकोर्टात दाखल केली आली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने भुयार खोदण्याच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र या भुयार खोदण्याच्या कामामुळे खरोखरच हेरिटेज इमारतींना धोका पोहोचणार आहे का याची पाहणी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पूर्ण दक्षिण मुंबईतील मेट्रोचं काम सुरु असलेल्या भागातल्या इमारतींची पाहणी करणार आहे. Mumbai_Metro मेट्रो 3 मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत जे एन पेटीट या 119 वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. पूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मार्गाच्या कामाकरता जी अवजड यंत्रसामुग्री मागवण्यात आली आहे, त्याच्या व्हायब्रेशन्समुळे अनेक जुन्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. तसंच जमिनीखाली खोदकाम करताना शेकडो वर्षापूर्वीच्या काही जुन्या इमारतींना यामुळे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान हायकोर्टाने गेल्या सुनावणी दरम्यान हे स्पष्ट केलं होतं की, आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो3 च्या संदर्भात पाहाणी करण्यात येणाराय. त्यांच्या मदतीनं इतरही इमारतींची पाहाणी करता येऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget