एक्स्प्लोर

गौरी लंकेश हत्याकांडातील तपासातून काहीतरी शिका : हायकोर्ट

सरकारं बदलत राहील, पण देशाचं काय? प्रशासन गुन्हेगारांना वरचढ आहे, हे सिद्ध का करावं लागतंय? अशा प्रश्नांची सरबत्तीही हायकोर्टाने केली.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासातील निष्काळजीपणावरुन मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला झापलं आहे. शिवाय, दाभोळकर-पानसरे हत्याकांडाबाबत तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यासही हायकोर्टाने नकार दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून काहीतरी शिका, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील दिरंगाईप्रकरणी सीबीआय, एसआयटीला झापलं. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्याकांडाच्या तपासाचा सीलबंद अहवाल सीबीआय, एसआयटीने हायकोर्टात नेला होता, मात्र मुंबई हायकोर्टाने तपासावर नाराजी व्यक्त करत सीलबंद अहवाल न वाचताच परत केला. शिवाय, हत्याकांडाचा तपास आजवर निष्काळजीपणे हाताळला गेला, अशी खरमरीत टीका हायकोर्टाने केली. सीबीआयचे सहसंचालक, गृहसचिव आणि एसआयटीचे प्रमुख यांनी आज हायकोर्टात हजेरी लावली होती. त्यांच्यासमोरच हायकोर्टाने तपासावर प्रश्न उपस्थित करत झापलं. यावेळी हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात अत्यंत गंभीर निरीक्षणं नोंदवली आहेत. “तपास अहवालात वारंवार त्याच गोष्टी कोर्टापुढे मांडल्या जातात. तपास अधिकारी बदलले जातात. या घटनांचा समाजावर होणारा परिणाम फार गंभीर असतो, आम्हाला याची जास्त काळजी वाटते.”, असे हायकोर्टाने म्हटले. शिवाय, सरकार बदलत राहील, पण देशाचं काय? प्रशासन गुन्हेगारांना वरचढ आहे, हे सिद्ध का करावं लागतंय? अशा प्रश्नांची सरबत्तीही हायकोर्टाने केली. तसेच, अशी परिस्थिती येईल की देशात प्रत्येकाला संरक्षण द्यावं लागेल, असेही हायकोर्ट म्हणाले. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून आणखी दोन महिन्यांचा अवधी मागितला गेला. त्यावरुनही हायकोर्टाने तपास यंत्रणांना झापलं. “सणासुदीचे दिवस असल्यानं हा अवधी मागताय का? सारी फोर्स बंदोबस्तात व्यस्त असेल. उद्या हायकोर्टाच्या अस्तित्त्वावरही सवाल उठवले जातील. हायकोर्टाही काही करु शकत नाही, असा संदेश जाईल.”, असे म्हणत हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटकारलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari  Akola : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर;मिटकरींचा दावाDevendra Fadnavis Jamner : जामनेरमध्ये महाजनांपेक्षा त्यांच्या पत्नीलाच जास्त मतं मिळतील - फडणवीसTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget