एक्स्प्लोर

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता

Mumbai rain news: मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईकरांसाठी बुलेटीनच्या सुरूवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन उशीराने धावत आहेत.

Mumbai Heavy Rain: मुंबई आणि उपनगरमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला (Water Logging) सुरुवात झाली आहे. परिणामी पुढील काही तासांमध्ये रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मि उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूर, कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला (rain news) सुरुवात झाली आहे. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान, पाऊसमान बघूनच घरातून बाहेर पडा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

हवामान खात्याने मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट अपग्रेड करत ऑरेंज केला असून आज दिवसभरात मुंबईत  70 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीत पावसाचा चांगलाच जोर आहे. कोकण किनाऱ्यावर मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पसरले आहेत. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसह कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरात बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यांसह पावासाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वसई-विरार, बोरिवली, अंधेरी, चर्चगेट या भागातही पावसाचा जोर रात्रीपासून कायम आहे.

Mumbai Lakes: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा वाढला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. वैतरणा आणि तानसामध्ये अतिवृष्टीची नोंद, वैतरणा धरण क्षेत्रात २३५ मिमी इतका तर तानसामध्ये २१८ मिमी पावसाची नोंद. भातसा परिसरात देखील १४१ मिमी पावसाची नोंद, मध्य वैतरणात १७० मिमी पाऊस. मागील २४ तासात घाट परिसरात अतिवृष्टी. ताम्हिणी घाटात अतिवृष्टी, २३० मिमी इतक्या पावसाची नोंद . मागील २४ तासात लोणावळ्यात १८७ मिमी पाऊस. भिवपुरी, डुंगरवाडी, दावडी, अंबोणे येथे मागील २४ तासात अतिवृष्टी झाली आहे.

Raigad Rain updates: रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, लोणावळ्यात तुफान पाऊस

रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलीय. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रोह्याजवळील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. तर दुसरीकडे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रायगडमधील अलिबाग, रोहा, तळा महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पर्यटननगरी लोणवळ्यातही तुफान पाऊस झालाय. गेल्या २४ तासांत तब्बल २२१ मिलिमीटर म्हणजेच ८.७० इंच पाऊस कोसळलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत ३२३ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर यंदा मात्र पावसाने इतकी जोमाने बॅटिंग केलीय की त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत ११६६ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.

पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुण्यात आज दिवसभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा

राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पुढील चार दिवस मुंबई पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget