एक्स्प्लोर

मुंबईत शनिवार, रविवारीच मोर्चे काढा, वाहतूक कोंडी होणार नाही : हायकोर्ट

मुंबई : लोकशाहीत मोर्चे व आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार व रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी अधिक होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. मंत्रालयापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतुकीची कोंडी होते. मोर्चे आझाद मैदानात थांबवा, अशी मागणी करणारी याचिका चर्चगेट रहिवाशी संघाने केली आहे. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मोर्चांमुळे वाहतुकीची कोंडी अधिक होत आहे. दिवसेंदिवस मोर्चांची संख्या वाढत आहे. राज्यभरातून निघणारे मोर्चे थेट आझाद मैदानावर येऊन धडकतात. याला निर्बंध घालणे आवश्यक आहे, अशी मागणी अॅड.एस. सी. नायडू यांनी केली. मोर्चांना निर्बंध घालण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. अतिर्नित गृह सचिव, पोलीस आयु्नत व महापालिका आयु्नत या समितीचे सदस्य आहेत. ही समिती या मुद्दयावर योग्य तो तोडगा काढणार आहे, असे राज्य शासनाने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील मत व्यक्त केले. मोर्चांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. पण त्यांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. नागरिकांना त्रास होणार नाही. वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सध्या तर ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे. नागरिकांना आता मोर्चांचीच सवय झाली आहे. मात्र राज्य शासनाने मोर्चांना निर्बंध घालायला हवेत, असे मत व्यक्त करत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Rain: मोठी बातमी: पुढील 7 दिवसांत मान्सूनचे आगमन, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी कोसळणार; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज?
पुढील 7 दिवसांत मान्सूनचे आगमन, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी कोसळणार; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
INFOCOM Mumbai : 'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget