एक्स्प्लोर
Advertisement
गणपती गेले गावाला : मुंबईच्या राजासह लालबागच्या राजाचं विसर्जन
गणेश विसर्जन मिरवणूक: राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक मुंबई : गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट पाहायला मिळाला. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली होती, संपूर्ण यंत्रणाही सज्ज होती.
मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष असतं. मुंबईतला पहिला मानाचा गणपती गणेश गल्लीचा राजा आणि लालबागचा राजा यांच्या विसर्जन मिरवणुकीकडे आणि विसर्जनाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं.
मुंबईच्या राजाचं काल (23 सप्टेंबर) रात्रीच गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. त्यानंतर आज सकाळी नऊ वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं.
विसर्जन मिरवणुकीदरम्यानचे अपडेट :
-
- तब्बल 21 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप
- लालबागचा राजा नागपाडा परिसरात दाखल, सुतारगल्ली-ओपेरा हाऊस-गिरगाव मार्गे मिरवणूक, पहाटे पाच वाजेपर्यंत विसर्जन होण्याची शक्यता
- मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
- लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक भक्तांचे मोबाईल-पाकीट चोरीला, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गर्दी
- लालबागचा राजा गणपती श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी
- तेजुकाया गणपतीवर 5 वेळा पुष्पवृष्टी
- मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी
- मुख्यमंत्र्यांच्या घरगुती बाप्पाचं 'वर्षा' निवासस्थानावरील कृत्रिम हौदात विसर्जन
VIDEO | मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी #बाप्पामाझा pic.twitter.com/0u7vVNkEKh
— ABP माझा (@abpmajhatv) September 23, 2018
- यंदा पहिल्यांदाच लालबागचा राजा गणेशगल्लीच्या राजाच्या पुढे, विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजामागे गणेशगल्लीचा राजा
- रंगारी बदक चाळ मंडळाची पारंपरिक मिरवणूक, लालबागमधील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक रंगारी बदक चाळीच्या गणेशोत्सवाचे हे 79 वे वर्ष आहे
- लालबागचा राजा मार्गस्थ
- दादर चौपाटीवर बीएमसीने कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत, असे 2 तलाव आहेत, ज्यात शाडूच्या गणपतींचे विसर्जन केले जाईल. त्यासाठी खास व्यवस्था केली आहे.
- गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी
PHOTO: गणेश गल्लीच्या राजाची जंगी मिरवणूक, पाहा फोटो https://t.co/BOvYZy6XdJ @vaibhavparab21 pic.twitter.com/ymQk5cxDUB
— ABP माझा (@abpmajhatv) September 23, 2018
- लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत विविध रंग आणि छटा. मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी, फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी सजला. हजारो भाविकांचा उत्साह शिगेला.
- लालाबागच्या राजाला निरोप देण्यासाठी कोळी बांधव नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे आजही कोळी महिला कोळी नृत्य सादर करून लालबागच्या राजाला निरोप देत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर लालबागला पुष्पवृष्टी केली जाणार आहे. लालबागमधल्या श्रॉफ इमारतींच्या रहिवाशांकडून ही पुष्पवृष्टी होते. यंदा तब्बल सहाशे किलो फुले आणि गुलाल उधळून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.
मुंबईतले लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया मंडळाचा गणपती या मानाच्या गणपतींसोबतच लालबागच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या सर्वच गणेशमूर्तींवर ही पुष्पवृष्टी होईल. LIVE : पुणे गणपती विसर्जन मिरवणूक प्रशासन सज्ज गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. गिरगाव चौपटीवरील गणेश विसर्जन सोहळा जागतिक पातळीवर कसा नेता येईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न बीएमसी आणि महारष्ट्र राज्य पर्यटन विभागाने केलेले पाहायला मिळत आहेत. शिवाय स्टिंग रे, जेलीफिशसारख्या माशांचा दंश होऊ नये यासाठी भाविकांनी पाण्यात विसर्जनासाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विदेशी पाहुण्यांसाठी विशेष मंडप, चौपटीवर विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यंदा निलांबरी बसची सुविधा सुद्धा केली आहे. वाहतूक मार्गात बदल मुंबईतील चौपाट्यांवर सार्वजनिक आणि घरगुती गणेशाचं विसर्जन होत असताना, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुकीचे नियमन केले जावे यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आज संपूर्ण मुंबईतील 53 रस्ते बंद ठेवले असून 56 रस्ते एक दिशा मार्ग म्ह्णजेच वन वे केले आहेत. काही मार्गांना पर्यायी मार्गसुद्धा करून देण्यात आले आहेत. जेणेकरुन वाहनचालकांना नियोजन करता येईल आणि वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासोबतच आज जवळपास 3 हजार ट्रॅफिक पोलीस, स्वयंसेवक ट्रॅफिकचा नियमन करण्यासाठी संपूर्ण मुंबईभर तैनात असणार आहेत. संबंधित बातम्या डॉल्बी लावण्यावरुन विश्वास नांगरे पाटील आणि उदयनराजे आमने-सामने LIVE : पुणे गणपती विसर्जन मिरवणूकअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement