Maharashtra News : किशोरी पेडणेकरांना तिसऱ्यांदा धमकीचं पत्र, जीवे मारण्याची धमकी, अजित पवारांचाही पत्रात उल्लेख
Maharashtra News : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी, पत्रात अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख
Maharashtra News : मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना धमकीचं पत्र आलं आहे. हे पत्र रायगडहून आलं असून या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हे पत्र रायगडहून आल्याची माहिती मिळत आहे. धमकी मिळण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. तसेच, सरकार पडू देत मग बघुन घेऊ, असा उल्लेखही या पत्रातून करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि खळबळजनक बाब म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे.
धमकीचं पत्र आल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात माजी महापौरांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर बलात्कार करण्याचीही धमकी या पत्रातून पेडणेकरांना देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे.
महापौर झाल्यापासून तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी
गेल्यावर्षीही किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्यानं किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना तिसऱ्यांदा धमकी आली आहे. आज आलेल्या पत्रातही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. अशातच किशोरी पेडणेकरांना आलेल्या धमकीच्या पत्रात करण्यात आलेल्या अजित पवारांच्या उल्लेखामुळे खळबळ माजली आहे. आधीच राज्यात सत्तांतराचा पेच निर्माण झाला आणि अशातच पत्रातील उल्लेखामुळे अजित पवारांबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण झाली असून ते क्वॉरंटाईन आहेत.