एक्स्प्लोर
वांद्रे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीची आग आटोक्यात
महत्त्वाचं म्हणजे ही आग पसरत वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरपर्यंत पोहोचली आहे.
मुंबई : मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग अखेर आटोक्यात आली आहे. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
अतिक्रमणावर कारवाई करताना आग
झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरु असताना दुपारी साडे तीनच्या सुमारास आग लागली. वस्तीमधील सिलेंडरचे स्फोट होत असल्याने तासाभरात आगीने विक्राळ रुप धारण केलं. आग एवढी भीषण होती की झोपडपट्टी तसंच वांद्रे स्टेशन परिसरात काळ्या धुराचे ढग जमा झाले होते.
महत्त्वाचं म्हणजे ही आग पसरत वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरपर्यंत पोहोचली आहे. तसंच वांद्रे स्कायवॉक आणि स्कायवॉकखालील वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे रस्ते बंद केल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता. तसंच आगीनंतर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-अंधेरी वाहतूक बंद करण्यात आली होती.
अडीच तासांनी आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि 10 वॉटर टॅंकरच्या मदतीने अडीच तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. वांद्रे स्टेशनच्या रेल्वे रुळाच्या अगदी लागूनच ही झोपडपट्टी आहे. दाटीवाटीच्या वस्तीमुळे तसंच आग आतल्या बाजूला लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचण येत होत्या.
अग्निशमन दलाचा जवान जखमी
दरम्यान ही आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान अरविंद घाटगे जखमी झाले असून त्यांच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कारवाईला विरोध नाही पण नोटीस द्यायला हवी होती : हाजी अलीम
कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने किमान 24 तास आधी नोटीस द्यायला हवी होती. कारवाईला विरोध नाही, पण नोटीस मिळायला हवी होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक हाजी अलीम यांनी दिली.
https://twitter.com/abpmajhatv/status/923502932191883265
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement