एक्स्प्लोर

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू

अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळ आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते.

मुंबई : मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागात सोमवारी संध्याकाळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. 'ईएसआयसी' कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीत सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर 147 जण जखमी झाले आहेत. कामगार रुग्णालयात दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली होती. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे रुग्णालय परिसरात धुराचे प्रचंड लोट वाहत होते. धुरात गुदमरल्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढल्याची माहिती आहे. कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीच्या बचावकार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता, तर कूपर रुग्णालयात दाखल केलेल्या एकाला उपचारांदरम्यान प्राण गमवावे लागले. त्यानंतर मृतांचा आकडा सहावर पोहचला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी 147 जणांची सुटका केली. त्यापैकी 15 जखमींना कूपर रुग्णालयात, 23 जणांना जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये, 40 जणांना होली स्पिरीट तर 30 जणांना सेव्हन हिल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू रुग्णालयात आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ज्या रुग्णांना चालताना त्रास होत होता, त्यांची सुटका करता अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

कामगार रुग्णालय आग : काचेच्या भिंतींची चकाकी जीवावर बेतली

शिडीच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य करण्यात आलं. रुग्णालयातील काही रुग्ण आणि नातेवाईकांनी घाबरुन इमारतीतून उड्या मारल्या. दोराच्या सहाय्याने बाहेर पडताना एका व्यक्तीचा हात सटकून ते खाली पडल्याची घटना कॅमेरात कैद झाली. तर एक महिला खिडकीतून मदतीसाठी विनवण्या करतानाही दिसत होती. अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू रुग्णालयात आणखी काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरु असताना श्वास गुदमरल्यामुळे अग्निशमन दलाचा जवानही जायबंदी झाला. अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू रुग्णांच्या नातेवाईकांनी परिसरात गर्दी केली असून आपल्या रुग्णाच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा करताना नातेवाईकही भावूक झालेले पाहायला मिळाले. इमारतीच्या मागच्या बाजूला काही रुग्णांना हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आगीनंतर वीज गेल्याने काळोख झाला, अशी माहिती एका रुग्णाने दिली. अंधारात हात पकडून आठ-दहा रुग्ण जिन्याने खाली आल्याचंही त्याने सांगितलं. अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू कामगार रुग्णालयाचा गलथानपणा -हॉस्पिटल प्रशासनाची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नव्हती -नोव्हेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलकडे मुंबई महापालिकेच्या आपत्कालन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र ही माहिती अद्यापही दिली गेली नाही. पालिकेने वारंवार विचारणा करुनही माहिती देण्यास टाळाटाळ. -गेली दोन वर्ष हॉस्पिटलमधील स्टाफचं आपत्कालीन नियंत्रण/व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेच नाही. हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने मोठं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Embed widget