एक्स्प्लोर
दमानियांच्या 28 तासांच्या आंदोलनानंतर खडसेंवर मुंबईत गुन्हा
खडसेंविरोधात कलम 509 अंतर्गत हा गुन्हा नोंदवला गेला आहे. आता याप्रकरणी खडसेंवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे.
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आंदोलनानंतर अखेर माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वाकोला पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील मुक्ताईनगरमध्ये 2 सप्टेंबर रोजी एकनाथ खडसेंनी दमानियांबद्दल अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तब्बल 28 तास दमानिया यांनी वाकोला पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला.
खडसेंविरोधात कलम 509 अंतर्गत हा गुन्हा नोंदवला गेला आहे. आता याप्रकरणी खडसेंवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी खडसेंना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. मात्र आजवर कुठल्याही स्त्रीचा आपण अनादर केला नाही. शिवाय अंजली दमानियांविषयी कुठलंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांमध्ये खडसेंवर कारवाई करण्याची हिंमत नाही : दमानिया
एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करा : अंजली दमानिया
दमानियांवर कुठलीही अश्लील टीका नाही, खडसेंचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement