एक्स्प्लोर
मुंबई एन्ट्री पॉइंट्ससह एक्स्प्रेस वे वर टोलबंदीचा विचार

मुंबई : आगामी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल बंद करण्याच्या विचारात आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइंट्ससोबतच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर असणाऱ्या टोलचाही यात समावेश असणार आहे. टोल बंद करण्याबाबातचा अहवाल सरकारला मिळाला असून त्याबाबत येत्या 6 ते 7 महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात वित्त विभागाशी अधिक चर्चा सुरु आहे. या प्रस्तावित टोलमुक्तीतून केवळ छोट्या वाहनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये 85 टक्के लहान गाड्यांचा समावेश असल्यामुळे याचा भार सरकारवर पडण्याची शक्यता आहे. सरकारच्या तिजोरीवर यामुळे वर्षाला 250 कोटींचा बोजा पडू शकतो.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम























