एक्स्प्लोर

मोठी बातमी! मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, 5 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कधी?

Mumbai: मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Mumbai: ईद-ए-मिलाद या इस्लाम धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणानिमित्त मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता ही सुट्टी सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी असणार असल्याची घोषणा सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू धर्मीयांचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे राज्यात ऐक्य व सलोखा टिकवण्यासाठी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी हिंदू - मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच सरकारने 5 सप्टेंबरला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून 8 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये 5 सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

सुट्टीचा बदल कुठे लागू?

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी 8 सप्टेंबर रोजी असेल.

इतर सर्व जिल्ह्यांसाठी मात्र यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 5 सप्टेंबर रोजीच सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात व राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये 5 सप्टेंबर रोजी बंद राहतील.

सरकारी कार्यालये सुरु राहणार

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी विभाग 5 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सुरु राहतील. सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांनी या बदलाबाबत संभ्रम न ठेवता कामकाजाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात. राज्यातील दोन महत्त्वाचे सण  अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद  लोख्याने साजरे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईत 5 सप्टेंबर रोजी सर्व कार्यालये आणि शाळा सुरु राहतील, तर 8 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी असेल. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरलाच सुट्टी राहणार असल्याने मुंबईकरांनी सुट्टीच्या तारखेत झालेल्या या बदलाची विशेष नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Babanrao Taywade: मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार? तिकडे ओबीसी महासंघाकडून इशारा, म्हणाले आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर...
मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार? तिकडे ओबीसी महासंघाकडून इशारा, म्हणाले आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर...
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
Embed widget