एक्स्प्लोर
Advertisement
मनसेच्या आंदोलनात देशपांडे आणि नांदगावकर यांच्यात जुंपली
विविध समस्यांवरुन मनसेतर्फे आज महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या एल विभागावर काढलेल्या मोर्चादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. आंदोलनात मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात जुंपली. एक विभागातील अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवला. मात्र बाळा नांदगावकर यांनी त्यांना शांत केलं. त्यामुळे संतापलेल्या संदीप देशपांडे आणि काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन अर्धवट सोडून काढता पाय घेतला.
विविध समस्यांवरुन मनसेतर्फे आज महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसेचे एकमेव असलेले नगरसेवक संजय तुर्डे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होते. या मोर्चात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, संतोष धुरी इत्यादी नेतेही सहभागी झाले होते.
काही महिन्यांपूर्वी नगरसेवक संजय तुर्डे यांना महापालिकेच्या एल विभागातील कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जेलमध्येही राहावं लागलं होतं. यावर आक्रमक होत मनसेने विविध प्रश्नावरुन आज एल विभागावर धडक मोर्चा काढला. यात मुंबईतून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकद दाखवण्यास जमले होते.
परंतु मूळ मुद्दा बाजूलाच राहून या आंदोलनात मनसेची अंतर्गत धुसफूस दिसून आली. अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवला. मात्र बाळा नांदगावकर यांनी त्यांना शांत केलं. त्यामुळे संतापलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी काढता पाय घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement