Dasara Melava : 6 अपर आयुक्त, 16 उपायुक्त, 45 सहाय्यक आयुक्त आणि साडे बारा हजारांचा ताफा, दसरा मेळव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज
Mumbai Police Security : मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मुंबई: मंगळवारी मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) मुंबई पोलीस सुसज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कायदा आणि सुव्यवस्था राहिल याची काळजी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी 6 अपर आयुक्त, 16 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2493 पोलीस अधिकारी आणि 12,449 पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
मंगळवारी बृहन्मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. तर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) तोफ धडाडणार आहे. हे दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
या दोन मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा वानखेडे स्टेडियम येथील सामना आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त,
- 6 अपर पोलीस आयुक्त,
- 16पोलीस उप आयुक्त,
- 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह
- 2493 पोलीस अधिकारी
-12,449 पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत.
त्यांच्यासोबत महत्वाच्या ठिकाणी 33 एसआरपीएफ प्लाटून, QRT Teams, होमगार्डस् अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे गाणे रिलिज
शिवसेना ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर रीलिज करण्यात आला आहे. पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss 'दैवत आपलं ठाकरे', असे गाण्याचे बोल आहेत. शिवसेनेतील फूट, बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाटचाल याबाबत या गाण्यातून भाष्य केलं आहे.
"ठाकरे ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत 'ठाकरे'! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत..'दैवत आपलं ठाकरे'!, असं शिवसेना ठाकरे गटाने म्हटलं आहे.
ही बातमी वाचा: