Mumbai News: समलैंगिक ॲपवरुन ओळख, अंगावर चटके देत मुंबई IIT च्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार
Mumbai Crime : एका समलैंगिक अॅपवरुन पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी ओळख करुन एका उच्चशिक्षिताने या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
Mumbai Crime : एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून पवईतील आयआयटीच्या (Indian Institute of Technology Mumbai) विद्यार्थ्याशी ओळख करुन त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंगावर चटके देत तांत्रिक सेक्स केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी आणि पीडित हे दोघेही पवईतील आयआयटी महाविद्यालयाचे आहेत. पवई पोलिसांनी (Powai Police) उच्चशिक्षित दाम्पत्यावर एका आयआयटी विद्यार्थ्याचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एका समलैंगिक अॅपवरुन पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी ओळख करुन एका उच्चशिक्षिताने या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर या आरोपी विद्यार्थ्याला प्रसाद खायला देऊन आणि अंगारा लावून मंत्राचा जप करायचा. शिवाय हात बांधून विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके देखील दिले होते. विद्यार्थ्यांला सेक्स स्लेव्ह बनवल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
33 वर्षीय आयआयटीच्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, आयआयटी पवईच्या खोलीत आणि आरोपी भाड्याने राहत असलेल्या क्रिस्टल टॉवरमधील घरात आरोपीने अत्याचार केले आहेत. आरोपी शुभ्र बॅनर्जीच्या पत्नीने फिर्यादीला धमकी दिली होती. पोलिसांनी बॅनर्जीसह पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याने 25 ऑक्टोबर 2022 रोजी या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी 11, फेब्रुवारीला पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलिसांनी कलम 377, 370, 307, 506, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा तर दाखल केला आहे. पण या मागची नेमकी कारणे काय आहेत याचा तपास आता पोलीस घेत आहेत. तसेच विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे.
मुंबईत IIT पवईच्या एका विद्यार्थ्याची हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
मुंबईतील पवई आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. दर्शन सोलंकी (वय 18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा (Ahmedabad) असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. 11 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा झाली होती आणि 12 फेब्रुवारी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शन आयआयटीमध्ये बी. टेकच्या केमिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. रविवारी दुपारी अचानक वसतिगृहाच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.